weather Update | राज्यामध्ये परतीचा पाऊस सुरू झालेला आहे. काही ठिकाणी ऑक्टोबरच्या उन्हाचा चटका बसत आहे. तर काही ठिकाणी मात्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दिवसभर कडाक्याचे ऊन पडते. तर रात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. विदर्भात देखील तापमानाचा पारा वाढलेला आहे. परंतु तिथे पाऊस (weather Update) देखील पडत आहे. राज्यात पावसाला पोषक असे वातावरण तयार झाल्यामुळे 21 ऑक्टोबरला देखील वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून या पावसाबद्दल नेहमीच अंदाज व्यक्त केला जातो. अशातच हवामान विभागाने आज म्हणजे 21 ऑक्टोबर रोजी काही भागात पावसाचा येल्लो अलर्ट दिलेला आहे.
आज राज्यात पावसाला (weather Update) पोषक असे वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
अनेक ठिकाणी तापमानाचा पारा देखील वाढलेला आहे. विदर्भात उन्हाचा कडाका वाढलेला असून येथील पारा 30° चा वर गेलेला आहे. परभणी, अकोला, वर्धा येथे देखील तापमानात वाढ झालेली आहे. काही ठिकाणी कडाक्याचा उन्हाळा सुरू झालेला आहे. तर काही ठिकाणी अजूनही शेतकऱ्यांना पावसाचा सामना करावा लागत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकणामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, त्याचप्रमाणे रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग या ठिकाणी पाऊस (weather Update) पडणार आहे. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना देखील येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड , धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. त्याचप्रमाणे बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गडचिरोली या ठिकाणी पावसाची (weather Update) शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पावसाचा परतीचा प्रवास थोडा लांबला असल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांची भाताची पिकं काढण्यासआलेली आहे. परंतु अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडल्याने भाताची पिके काढण्यासाठी उशीर होत आहे. आणि पर्यायाने त्यांचे नुकसान होत आहे.