Weather Update | सध्या राज्यामध्ये परतीचा पाऊस चालू आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी कडाक्याचे ऊन पडलेले आहे. हवामान विभाग देखील पावसाबद्दल अंदाज व्यक्त करत असतात. अशातच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्राच्या कोकणासह मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस 9Weather Update) पडणार आहे. त्यामुळे या विभागांना येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. सध्या राज्यामध्ये तापमानाची चढ-उतार होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचे सरी कोसळत आहे. वादळी वारा वाहत आहे. तसेच तापमानात देखील बदल होत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तास कोकणामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस (Weather Update) येण्याची शक्यता आहे. या वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने असणार आहेम यासोबतच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी देखील घाट माथ्यावर वातावरणात आपल्याला गारवा पाहायला होणार आहे. परंतु दुसरीकडे मुंबई आणि उपनगरामध्ये उन्हाचा तडाका वाढताना दिसत आहे. आणि याचा नागरिकांना देखील त्रास होणार आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाच्या पट्टे निर्माण झालेले आहे. त्यामुळे चक्रकार वारे आणि त्यानंतर वादळात देखील रूपांतर आलेले आहे. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणूनच राज्यांमध्ये सोसाट्याचा वाऱ्याचे प्रमाण वाढलेले आहे. आणि अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील पडत आहे. येत्या 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रसह ओडीसा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर देखील वादळाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या दरम्यान वाऱ्याचा वेग तशी 120 km असल्याचे सांगण्यात आलेले आहेत.