Weather Update | पुढील 3 दिवस राज्यात पावसाचा धुमाकूळ; ‘या’ जिल्ह्यांना दिला ऑरेंज अलर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Weather Update | महाराष्ट्रातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. पावसाची उघडझालं देखील चालू आहे. मागील काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. परंतु पुन्हा एकदा मान्सून महाराष्ट्रात सक्रिय झालेला आहे. याबाबतची माहिती हवामान विभागाने दिलेली आहे. त्यामुळे सोमवारपासून म्हणजेच आज 23 सप्टेंबर पासून पुढील तीन दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

अंदमानमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे..त्यामुळे महाराष्ट्र पावसासाठी पोषक असे वातावरण तयार झाल्याने आता पुढील काही दिवस महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाऊस (Weather Update) पडताना दिसणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्र मध्ये परतीच्या पावसासाठी पोषक कसे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसणार आहे. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण या विभागांमध्ये देखील 23 सप्टेंबर नंतर पाऊस धुमाकूळ घालणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 24 सप्टेंबर रोजी रायगड, परभणी, हिंगोली आणि नांदेड तसेच 25 सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे पुणे, 26 सप्टेंबर रोजी नाशिक या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट होणार आहे. तसेच या विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलेला आहे.

मोठ्या विश्रांतीनंतर पाऊस उचलायला सोमवारपासून मुंबईचा इतर भागांमध्ये सुरुवात होणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्ये विशेषतः जोरदार पाऊस पडताना दिसत आहे. त्याचप्रमाणे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत या पावसाची रिमझिम चालूच राहणार आहे अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे.