Weather Update | राज्यामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि अनेक ठिकाणी सध्या पाऊस देखील पडत आहे. राज्यात बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रतीचा पाऊस सुरू झालेला होता. यादरम्यान विविध महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवस राज्यातील हवामान कोरडे असणार आहे. परंतु हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 26 आणि 27 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील बहुतांश ठिकाणी आज हवामान कोरडे असणार आहे. परंतु शनिवारी म्हणजे उद्या विदर्भ, गडचिरोली आणि नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे रविवारी विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
सध्या पुण्यात देखील पावसाचा (Weather Update) जोर बऱ्यापैकी कमी झालेला आहे. त्यामुळे पुण्यातील परिसरात देखील हवामान कोरडे असणार आहे. परंतु अधून मधून ढगाळ वातावरण दिसण्याची शक्यता देखील आहे. तसेच घाट परिसरात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. यासोबत सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी कोरडे हवामान असेल. आज पुण्यामध्ये कमाल तापमान हे 30°c एवढे असणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे.