Weather Update | पुढील 4 दिवस महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा धोका; हवामान खात्याचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Weather Update | गेल्या आठवड्याभरापासून महाराष्ट्रात पावसाचा जोर चांगलाच वाढलेला दिसत आहे. हवामान खाते देखील सतत पावसाबद्दलचे अंदाज व्यक्त करत असतात. अशातच हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे की, 27 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रात चांगलाच मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडणार आहे. यामध्ये खास करून नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर यांसारख्या 13 जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

त्याचप्रमाणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवसात मुंबई तसेच कोकण, विदर्भ, खानदेश, नाशिक, नांदेड यांसारख्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. तसेच कोकण आणि घाटमाथ्याच्या परिसरात देखील पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. 25 ऑगस्टनंतर पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक यांसारख्या जिल्ह्यांच्या धरणांतील पाण्याचा विसर्ग देखील होणार आहे. त्यामुळे नदीकाठची जी गावे आहेत, त्यांना सतर्कतेचा इशारा देखील हवामान विभागाने वर्तवलेला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 31 ऑगस्टनंतर 5 सप्टेंबर पर्यंत विदर्भ, खानदेश, नाशिक, मुंबई या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा(Weather Update) जोर कमी होण्याची शक्यता जाणवते. परंतु इतर ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार आहे. सध्या पावसामुळे अनेक नदी, नाले, धरणे सांडून वाहताना दिसत आहेत. त्यामुळे नदी काठच्या गावांना धोका देखील निर्माण झालेला आहे. तसेच पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने अनेक पर्यटक हे पर्यटनासाठी जाताना दिसत आहे. त्यामुळे या लोकांना प्रशासनाने देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. कारण पावसाचा जोर आणि वादळ वारा यांचा जोर देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे.