Weather Update | सप्टेंबर महिन्याच्या शेवटी पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात चांगलाच पडलेला आहे. त्यानंतर पावसाने काही दिवस विश्रांती घेतलेली. आणि बहुतांश राज्यांमधून मान्सून परत देखील फिरला आहे. परंतु आता महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा 5 ऑक्टोबर पासून परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि नंदुरबार जिल्ह्यातून तो पुन्हा परतला देतील आहे. इथे संपूर्ण महाराष्ट्रात सध्या परतीच्या पावसाचे वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे 10 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात परतीचा पाऊस चालू होणार आहे. त्यामुळे जाता जाता पुन्हा एकदा यावर्षीचा पाऊस संपूर्ण राज्यात धुमाकूळ घालणार आहे.
सध्या राज्यामध्ये परतीच्या पावसाचे वातावरण तयार झालेले आहे. याबद्दलची माहिती भारतीय हवामान खात्याने दिलेली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज म्हणजे 7 ऑक्टोबर पासून पुन्हा एकदा देशात परतीच्या पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे 7 ऑक्टोबर पासून ते 11 ऑक्टोबर पर्यंत देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता कोणत्या दिवशी कुठे पाऊस पडणार आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
7 ऑक्टोबर 2024 | Weather Update
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज म्हणजे सोमवारी 7 ऑक्टोबर रोजी चार राज्यांमध्ये मुसळधार त्यातील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये केरळ, तमिळनाडू, कोस्टल कर्नाटक आणि दक्षिण कर्नाटक यांचा समावेश आहे.
8 ऑक्टोबर 2024
8 ऑक्टोबर 2024 मध्ये देखील जवळपास 11 राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. केरळ, लक्षद्वीप, तमिळनाडू, कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, आसाम आणि मेघालयांमध्ये उद्या जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
9 ऑक्टोबर 2024
9 ऑक्टोबर रोजी देखील देशातील विविध राज्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवलेली आहे. लक्षद्वीप, कर्नाटक, केरळ, अरुणाचल प्रदेश, नागालँड, तमिळनाडू, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, आसाम आणि मेघालय या राज्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
10 ऑक्टोबर 2024
10 ऑक्टोबर रोजी अनेक राज्यातील पावसाचा जोर हा कमी होणार आहे. आयएमडीने तरी देखील सहा राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिलेला आहे. यामध्ये लक्षद्वीप, केरळ, अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू, आसाम आणि मेघालय या राज्यांचा समावेश आहे.