Weather Update | विजांच्या कडकडाटासह राज्यातील ‘या’ भागांत पुढील 24 तासात होणार मुसळधार पाऊस

Weather Update
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Weather Update | संपूर्ण देशात आता परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये सध्या पाऊस बरसताना दिसत आहे. अनेक ठिकाणी पाऊस शांत स्वरूपात येत आहे, तर काही ठिकाणी पावसाने मात्र रुद्र अवतार धारण केलेला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये देखील अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे. याबाबतची माहिती हवामान विभागाने दिलेली आहे हा पाऊस 24 तासांमध्ये सातारा, पुणे आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी पाऊस होणार आहे. तसेच या ठिकाणी पावसाचा जोर कमी असेल, परंतु विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट आपल्याला पाहायला मिळणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. त्यामुळे राज्याला येलो अलर्ट जारी केलेला आहे. पावसाचा आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे. त्यामुळे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा आणि सांगली या ठिकाणी ढगांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असणार आहे. त्याचप्रमाणे ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.

ऑक्टोबर महिन्यात राज्यातील अनेक ठिकाणी तापमान वाढ झालेली आहे. विदर्भापासून ते मुंबई पर्यंत देखील खूप जास्त तापमान वाढ झालेली दिसत आहे. परंतु आता परतीचा पाऊस येण्याची शक्यता असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात थंडावा पसरणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील 24 तासांमध्ये कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 सेल्सिअस असणार आहे. या ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे.