Weather Update | राज्यात आजपासून परतीच्या पावसाला सुरुवात; ‘या’ ठिकाणी कोसळणार मुसळधार सरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Weather Update | काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा राज्यामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. पावसासाठी पोषक असे वातावरण संपूर्ण राज्यात पाहायला मिळालेले आहे. आज पासून पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली गेलेली आहे. हा परतीचा पाऊस आता येत्या काही दिवसात संपूर्ण राज्यात हजेरी लावणार आहे. त्यामुळे आज आपण कुठे पाऊस पडणार आहे हे जाणून घेणार आहोत.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज विदर्भातील जवळपास 11 जिल्ह्यात तसेच नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे मुंबई आणि कोकण तसेच मराठवाड्यात देखील आज अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनने जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थानी या भागात परतीचा पाऊस झालेला आहे. तसेच उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागात देखील परतीचा पाऊस झालेला आहे. परंतु उरलेल्या काही भागात आता पुढील दोन-चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे पुढील 48 तासात महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्यात पावसासाठी पोषक असे वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे हवामान विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिलेला आहे.

यासोबतच कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात देखील अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. उद्या म्हणजेच गुरुवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहील अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे.