हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील २ -३ दिवसापासून महाराष्ट्रात जवळपास सर्वच भागात मुसळधार पाऊस पडत आहे. आजही हा पाऊस असाच कायम राहणार असून राज्यातील मुंबई, ठाण्यासह पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापुर, रत्नागिरी, सातारा रायगडसह पश्चिम घाटात पुढील दोन दिवसांत वादळी पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मान्सून) उत्तरी सीमा आज स्थिर आहे. पुढील तीन ते चार दिवसात मान्सून दक्षिण महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी अनुकुल परिस्थिती असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आहे.
आज महाराष्ट्राच्या जवळपास संपूर्ण भागात, उद्या काही जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा यासोबत मध्यम पाऊस पाहायला मिळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ८ तारखेला कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा व विदर्भामध्ये ८ तारखेपासून पुढील चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजही मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हवामान विभागाने यलो अलर्ट दिलाय.
मान्सून पुढील 3 ते 4 दिवसात दाखल होण्याची शक्यता- Weather Update
महाराष्ट्रामध्ये ८ ते १० जून दरम्यान मान्सून दाखल होतो. यावर्षीही मान्सून पुढील तीन ते चार दिवसात दाखल होण्याची शक्यता वर्तविली आहे. मात्र, त्या आधीच राज्यातील बहुतांश भागात पूर्वमौसमी पाऊस झोडपून काढत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मान्सूनच्या आधीच जनजीवन विस्कळीत झाल आहे. काही ठिकाणी तर सकाळी ऊन आणि दुपारनंतर वादळी पाऊस पाहायला मिळत आहे.