Weight Gain : वजन वाढविण्यासाठी ‘या’ फळांचे करा सेवन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल जगातील अनेक लोक ही लठ्ठपणामुळे त्रस्त असतात. मात्र असेही काहीजण आहेत ज्यांनी कितीही काहीही खाल्लं तरी त्यांचं वजन वाढत नाही. अशा लोकांनी आपलं वजन वाढवण्याची (Weight Gain) आपल्या जीवनशैलीत काही बदल करणं आवश्यक आहे. योग्य आहार आणि नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही फळांबाबत (Fruits) सुद्धा सांगणार आहोत ज्याचे सेवन केल्याने तुमचे वजन वाढेल.

Banana
Raw Organic Bunch of Bananas Ready to Eat

1) केळी- (Banana) 

वजन वाढवण्यासाठी स्वस्तात मस्त उपाय म्हणजे केळी… अगदी कोणत्याही सीझनमध्ये तुम्हाला हे फळ मिळणारचं. केळ्यामध्ये पोटॅशियम भरपूर असते. ज्यांना वजन वाढवायचे असेल त्यांना अगदी हमखास केळी खाण्याचा सल्ला दिला जातो.

Sapodilla

2) चिकू – (Sapodilla)

चिकू खाल्ल्याने सुद्धा आपलं वजन वाढवण्यास मदत होते. चिक्कू मध्ये शुगर आणि कॅलरीजचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होते.

Anjeer

3) अंजीर – (Anjeer)-

अंजीरच्या सेवनाने तुमचे वजन वाढू शकते. अंजीर हे फळ आणि ड्रायफ्रुट अशा दोन्ही प्रकारामध्ये मिळते. सुके आणि ओले अंजीर वजन वाढीसाठी चांगले असतात. सुके अंजीरमध्ये कॅलरीजचे प्रमाण अधिक असते. याचे सेवन केल्याने शरीराचे वजन वाढण्यास मदत होते. एकावेळी दोन ते तीन अंजीर खायला काहीच हरकत नाही

Apricot

4) सुके जर्दाळू (Apricot) –

जर्दाळू मध्ये 67 कॅलरीज आणि 18 ग्राम कार्बोहायड्रेट असतात. त्यामुळे जर्दाळू खाल्ल्याने तुमचं वजन वेगाने वाढू शकते. पण तुम्ही योग्य पद्धतीने जर्दाळूचे सेवन करायला हवे. . एकावेळी किमान दोन ते तीन जर्दाळूची फळे खायला काहीच हरकत नाही.

Avocado

5) अवाकाडो (Avocado)-

अवाकाडोमध्ये वजन वाढविण्यासची क्षमता अधिक असते. अवाकाडोमध्ये पोटॅशिअम, कार्बोहायड्रेट,सोडियम, व्हिटॅमिन A,C,B-6, मॅग्नेशिअम अशी पोषकतत्वे असतात . त्यामुळे याच्या सेवनामुळे तुमचे वजन वाढू शकते.