आपण धोक्याच्या ठिकाणी उभे आहोत!! महिला पत्रकाराची मुलाखत ट्रम्पनी मध्येच थांबवली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी महिला पत्रकाराशी बोलताना आपली मुलाखत मध्येच थांबवली. आपण ज्याठिकाणी उभं राहून बोलतोय ते धोकादायक आहे असं म्हणत त्यांनी मध्ये मुलाखत सोडून दिली. ॲरिझोना येथील अमेरिका-मेक्सिको सीमेवर पत्रकार अली ब्रॅडली यांच्या भेटीनंतर ते बोलत होते. महत्वाची बाब म्हणजे रिपब्लिकन उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी देणारा रोनाल्ड ली सिव्रुड याला अधिकारी शोधत असताना हे सगळं घडलं.

ब्रॅडलीने ट्रम्प यांना प्रश्न विचारताच ट्रम्प यांनी ॲरिझोनामधील ‘परिस्थिती’चा उल्लेख केला. ते म्हणाले , मी तुला एक सांगू का? आपण आता याठिकाणी उभं राहून बोलत आहोत ते धोकादायक आहे, त्यामुळे अजून तू पुढे काही बोलू नको. मला माहीत आहे, पण मी इथे उभं राहावं असं त्यांना वाटत नाही. तुम्ही इथे उभं राहावं असंही त्यांना वाटत नाही असं ट्रम्प म्हणाले. यानंतर ट्रम्प लगेचच आपल्या गाडीत बसले आणि निघून गेले. अली ब्रॅडली रिपब्लिकन अध्यक्षपदाच्या उमेदवाराशी त्याच्या रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियरशी असलेल्या संबंधांबद्दल बोलत होते, जे शुक्रवारी 2024 च्या शर्यतीतून बाहेर पडतील.

रिपोर्टरला मध्येच थांबवण्यापूर्वी ट्रम्प म्हणाले होते कि, आरएफके ज्युनियरने त्यांच्याशी मंत्रिमंडळातील पदाबद्दल अद्याप काहीही चर्चा केलेली नाही. मला त्याच्याबद्दल खूप आदर आहे, आणि मला वाटते की तो माझ्याबद्दल खूप आदर करतो. तुम्हाला माहिती आहे, आमच्यात दीर्घ काळासाठी चांगले संबंध आहेत. जर त्याने समर्थन केले तर ते माझ्यासाठी एक सन्मान असेल.” “मला त्याच्याबद्दल चांगला आदर आहे, तो हुशार आहे, पण थोडा वेगळा माणूस आहे. पण आम्ही त्याचे समर्थन करू असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हंटल.