अमित शहांच्या व्हर्च्य्युअल रॅलीवर ममता दीदी म्हणाल्या, ‘हे’ फक्त भाजपलाच परवडू शकत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोलकाता । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या व्हर्च्य्युअल रॅलीसाठी ७० हजार एलईडी स्क्रीन वापरण्यात आल्याचे आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून समजल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या. हे फक्त भारतीय जनता पक्षालाच परवडू शकते असा टोला ममता दीदींनी अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाला लगावला आहे.

त्या पुढे म्हणाल्या, ३० जूनपर्यंत लॉकडाउनची अंमलबजावणी केली जाईल. यासह, कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नातेवाईक देखील मृतदेहाचे अंतिम दर्शन करू शकतील. तसेच, आम्ही लग्नाच्या सोहळ्यामध्ये आणि मंदिरात एकत्र येण्यासाठी १० ते २५ लोकांना परवानगी दिली आहे, असेही त्या म्हणाल्या. बंगालमध्ये राहणारे स्थलांतरित मजूर येथे आनंदाने राहत आहेत याचा मला आनंद आहे. त्यांना त्यांच्या मूळ राज्यात परत यायचे नाही. परंतु आपल्या राज्यातील स्थलांतरित मजूर इतर राज्यांत अनेक संकटांना सामोरे जात आहेत, याकडेही ममता दीदींनी लक्ष वेधले आहे.

केवळ संघटित शक्तीच दु:ख सहन करू शकते हे कायम लक्षात ठेवा असेही त्या म्हणाल्या. आतापर्यंत २० पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. सीआयएसएफ आणि सीआरपीएफच्या जवानांनाही संसर्ग झाला आहे. या कठीण काळात हेच लोक कोरोनाशी थेट लढा देत आहेत, असेही ममतादीदी पुढे म्हणाल्या. ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, आम्ही जागतिक बँकेकडून विशेष कर्ज घेतले असून त्यापैकी १,०५० कोटी रुपये लॉजिस्टिक आणि पायाभूत सुविधांवर खर्च होणार आहेत. तर ८५० कोटी रुपये पेन्शन आणि सामाजिक पायाभूत सुविधांवर खर्च केले जातील अशी माहितीही ममता दीदींनी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment