हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Western Railway । देशातील शहरे मुंबईला जोडण्यासाठी आणि मुंबईतील रेल्वेचे जाळे आणखी मजबूत करण्याच्या दिशेने पश्चिम रेल्वेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. पश्चिम रेल्वेने मुंबईवरून दोन नव्या विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. वांद्रे टर्मिनस – विरांगणा लक्ष्मीबाई झांसी आणि वांद्रे टर्मिनस – सुभेदारगंज स्थानकांदरम्यान आठवड्यातून या २ सुपरफास्ट रेल्वेगाड्या चालवण्यात येतील. या ट्रेन विशेष भाड्याने चालवल्या जातील. या दोन्ही ट्रेनचे वेळापत्रक कसं असेल? कोणकोणत्या स्थानकांवर त्यांना थांबा मिळेल याबाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात…..
१) वांद्रे टर्मिनस – विरांगणा लक्ष्मीबाई झांसी सुपरफास्ट ट्रेन – Western Railway
ट्रेन क्रमांक ०२२०० वांद्रे टर्मिनस – विरांगणा लक्ष्मीबाई झांसी सुपरफास्ट स्पेशल ट्रेन दर शनिवारी सकाळी ०५.१० वाजता वांद्रे टर्मिनस येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०५.०० वाजता विरांगणा लक्ष्मीबाई झांसी येथे पोहोचेल. ५ जुलै ते २७ सप्टेंबर २०२५ पर्यंत हि ट्रेन धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक ०२१९९ विरांगणा लक्ष्मीबाई झांसी – वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट स्पेशल दर गुरुवारी दुपारी ४.५० वाजता विरांगणा लक्ष्मीबाई झांसी येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४.१० वाजता वांद्रे टर्मिनस येथे पोहोचेल. ही ट्रेन ०३ जुलै ते २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत धावेल. या ट्रेनमध्ये एसी २-टियर, एसी ३-टियर, एसी ३-टियर (इकॉनॉमी), स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास कोच आहेत.
कोणकोणत्या स्थानकांवर थांबा –
वांद्रे टर्मिनस – विरांगणा लक्ष्मीबाई झांसी सुपरफास्ट स्पेशल ट्रेन बोरिवली, वापी, सुरत, भरूच, वडोदरा, गोधरा, दाहोद, रतलाम, नागदा, उज्जैन, मकसी, बियावरा राजगड, चाचौरा बिनागंज, रुथियाई, गुणा, शिवपुरी, ग्वाल्हेर, डाबरा आणि दातिया स्थानकांवर थांबेल. Western Railway
२) वांद्रे टर्मिनस – सुभेदारगंज सुपरफास्ट ट्रेन –
ट्रेन क्रमांक ०४१२६ वांद्रे टर्मिनस – सुभेदारगंज सुपरफास्ट स्पेशल दर मंगळवारी सकाळी ११.१५ वाजता वांद्रे टर्मिनस येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ५.०० वाजता सुभेदारगंज येथे पोहोचेल. ही गाडी ८ जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक ०४१२५ सुभेदारगंज – वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट स्पेशल दर सोमवारी सकाळी ०५.२० वाजता सुभेदारगंज येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०९.३० वाजता वांद्रे टर्मिनस येथे पोहोचेल. ही गाडी ७ जुलै ते २९ सप्टेंबर २०२५ पर्यंत धावेल. या ट्रेनमध्ये एसी ३-टियर, एसी ३-टियर (इकॉनॉमी), स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास डबे आहेत. परंतु ०८ जुलै २०२५ रोजी सुरू होणाऱ्या ट्रेन क्रमांक ०४१२६ आणि ०७ जुलै २०२५ रोजी सुरू होणाऱ्या ट्रेन क्रमांक ०४१२५ मध्ये फक्त एसी ३-टायर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास डबे असतील.
कोणकोणत्या स्थानकांवर थांबा –
वांद्रे टर्मिनस – सुभेदारगंज सुपरफास्ट ट्रेन (Western Railway) बोरिवली, वापी, वलसाड, सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा, सवाई माधोपूर, गंगापूर सिटी, बयाना, रूपबास, फतेहपूर सिक्री, इदगाह, टुंडला, इटावा, गोविंदपुरी आणि फतेहपूर स्टेशनवर थांबेल. ट्रेन क्रमांक ०२२०० आणि ०४१२६ साठी बुकिंग १९ जूनपासून सर्व पीआरएस काउंटरवर आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू होईल.




