काय सांगता !!! 1 वर्षात 1 लाख रुपयांचे 10 लाख?? कसे ते पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुंम्हाला कोणी म्हंटल की,1 वर्षात 1 लाख रुपयांचे 10 लाख रुपये होतात तर तुम्हाला ते पटणार नाही. पण शेअर मार्केट मध्ये हे शक्य झालं आहे. शेअर मार्केट मध्ये काही शेअर्स असेहीआहेत, जे गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून देतात. Tina Rubber & Infrastructure या कंपनीचे शेअर्सही त्यापैकीच एक आहे. या शेअरने गेल्या वर्षभरापासून गुंतवणूकदारांना मजबूत रिटर्न देत आहे.

Tina Rubber & Infrastructure या कंपनीमध्ये दिग्गज गुंतवणूकदार डॉली खन्ना यांचा 1.60% हिस्सा म्हणजेच एकूण 1,37,057 शेअर्स आहेत. डॉली खन्ना शेअर मार्केटमधील एक्‍सपर्ट मानल्या जातात. त्या नेहमीच अशा शेअर्समध्ये पैसे गुंतवतात ज्याद्वारे भरपूर नफा मिळतो.

Tina Rubber & Infrastructure ने या वर्षी गुंतवणूकदारांना आतापर्यन्त 85% रिटर्न दिलेला आहे. 28 एप्रिल 2022 या शेअर्सची किंमत 34.05 रुपये होती, तर 25 एप्रिल 2022 पर्यंत या शेअर्स मध्ये वाढ होऊन त्याची किंमत 350 रुपये झाली आहे. या शेअरने वर्षभरात जवळपास 900% इतका रिटर्न दिलेला आहे. तर गेल्या सहा महिन्यात या शेअरने 163% रिटर्न दिला आहे. गेल्या महिन्याभराबाबत बोलाल तर यामध्ये 22.40 रुपयांची वाढ झालेली आहे. या वर्षी आतापर्यंत 83.21% इतका रिटर्न दिलेला आहे.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअर मध्ये 1 लाख रुपये गुंतवले असेल तर ते आतापर्यंत 1.23 लाख रुपये झाले असतील. अशाच प्रकारे जर कोणी सहा महिन्यांपूर्वी गुंवणूक केली असेल तर त्याचे 2.65 लाख रुपये झाले असतील. त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी टीना रबर आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील , तर आज त्याची किंमत 10 लाख रुपये झाली असेल.

Leave a Comment