पेट्रोलला हद्दपार करा असे म्हणत नितीन गडकरींनी सांगितला ‘हा’ फॉर्मुला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने चांगलेच उच्चांक गाठले आहेत. इंधन दरवाढीमुळे केंद्र सरकारवर सर्वसामान्य लोक नाराज आहेत. आता पेट्रोल-डिझेलच्या पर्यायी व्यवस्थावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रशियन शास्त्रज्ञाने दिलेला एक फॉर्मुला सांगितला आहे. “साखर उत्पादकांनी साखरेऐवजी इथेनॉल उत्पादनावर भर दिला पाहिजे. त्यातच भविष्य आहे. पेट्रोलला हद्दपार करा आणि वाहनांमध्ये इथेनॉलचा अधिकाधिक वापर होईल या दृष्टीने लक्ष केंद्रित करावे. रशियन शास्त्रज्ञांनी तीन महिने ट्रायल केल्यानंतर इथेनॉलची व पेट्रोलची कॅलरी व्हॅल्यू समान असल्याचे सांगत एक फॉर्मुला दिला असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

सोलापुरात मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तब्बल 8 हजार कोटी रुपयांच्या चार महामार्गाचे लोकार्पण आणि 164 कोटी रुपयांच्या सहा महामार्गावरील प्रकल्पांचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. यावेळ गडकरी यांनी पेट्रोलला हद्दपार करत त्याला पर्याय असल्याचे सांगितले. यावेळी गडकरी म्हणाले की, उसाच्या रसापासून जास्तीत जास्त इथेनॉल तयार केले पाहिजे. सोलापूर भागात इथेनॉल तयार होत आहे. त्यासाठी मी आता फ्लेक्स इंजिन आणले आहे. त्याच्यात पंप टाकावे याकरिता परवानगीही घेतली आहे. फ्लेक्स इंजिन म्हणजे टू व्हीलर, फोर व्हीलर व ऑटो रिक्षा या शंभर टक्के बायो इथेनॉलवर चालू शकतात त्याला फ्लेक्स इंजिन असे म्हणतात. अनेक गाड्यांच्या कंपन्यांचे फ्लेक्स इंजिन ब्राझील, कॅनडा या ठिकाणी आहेत. त्याच्या गाड्या येत्या सहा महिन्यातच आपल्याकडे येणार आहेत.

फ्लेक्स इंजिनबाबत वाचल्यानंतर मी रशियाच्या शास्त्रज्ञांना भारतात बोलवले. त्यांना प्रेझेंटेशन सागितले. तसेच पेट्रोलियम सेक्रेटरी, इंडीयन पिलचे चेअरमन यांच्यासह त्यांच्या रिसर्च करणाऱ्या टीमला बोलवले. तीन महिने ट्रायल झाली. त्यानंतर रशियन शास्त्रज्ञांनी जो फॉर्म्युला दिला त्यातून इथेनोलची कॅलरी व्ह्याल्यू व पेट्रोलची समान झाली आहे. त्यामुळे एनाऱ्या काळात पेट्रोल ऐवजी इथेनोलचा वापर केला पाहिजे.

Leave a Comment