हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विमानाने (Aeroplane) प्रवास करणे हे आपल्यापैकी बऱ्याच जणांसाठी आपरूपाची बाब असते. जगभरात कमी दरात विमान प्रवास घडवून आणणाऱ्या बजेट एअरलाईनमुळे मात्र आजकाल सर्वसामान्यांना विमान प्रवास करणे सहज शक्य झाले आहे. आपल्यापैकी बरेचजण कित्तेक वेळेस विमानात बसले देखील असतील पण त्यांना हे नक्कीच माहित नसेल की, विमानात कोणते इंधन वापरले जाते? चला तर आज आपण जाणून घेऊया …
विमानात वापरल्या जाणारे इंधन हे आपण आपल्या वाहनात वापरतो ते पेट्रोल किंवा डिझेल अजिबात नसते. विमान चालवण्यासाठी विशेष पद्धतीचे इंधन वापरले जाते. त्याला गॅसोलीन (gasoline ) असे म्हणतात . तसं बघायला गेले तर विमान इंधनाचे दोन प्रकार असतात. जेट ए आणि जेट बी अशी विमान इंधनाचे दोन वेगवेगळे प्रकार असतात . विमान इंधनाच्या गोठणबिंदू वरून हा फरक केला जातो. प्रवासी वाहतुकीच्या विमानासाठी वेगळे आणि लष्करी विमानासाठी वेगळे इंधन वापरले जाते.
कसे बनते विमानाचे इंधन-
कच्चे तेल शुद्ध करताना, जेट इंधन आणि पेट्रोल वेगळे केले जातात. या दोघांमधील मूलभूत फरक त्यांच्यातील हायड्रोकार्बनच्या प्रमाणावर आधारित आहे. पेट्रोल हा हायड्रोकार्बन आहे ज्यात 7 ते 11 कार्बन अणू असतात, तर जेट इंधन हा हायड्रोकार्बन असतो. ज्यात 12 ते 15 कार्बन अणू असतात.
विमान इंधनाचे दर कसे ठरवले जातात :
पेट्रोल किंवा डिझेलवर प्रामुख्याने मोठया प्रमाणात कर लावलेले असतात . ह्या सर्व प्रकारच्या कराची रक्कम तुम्हा- आम्हा कडून वसुल केले जाते मात्र विमान इंधनबाबत हे होताना दिसत नाही. विमान इंधनाचे दर निश्चित करण्यासाठी वेगळ्या प्रकारची प्रणाली वापरली जाते. मुख्यत्वे विमानाचे इंधन किलोलीटर प्रमाणात विकले जाते. मुंबईत विमान इंधनचे दर 1 लाख 11 हजार रुपये किलोलीटर आहे. बोईंग 747 या विमानाच्या बाबतीत बघायला गेलं तर 1 सेकंदाला 4 लिटर इंधन खर्च होते. 1 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी 12 लिटर इंधन वापरले जाते. तसेच 10 तास उड्डाण करण्यासाठी किमान 1.50 लाख लिटर इंधन लागेल.