E-Sim म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे -तोटे?

E- sim
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रांनो,आजकाल प्रत्येकाच्याच हातात मोबाईल (Mobile) असतो. मोबाईल म्हंटल की त्यामध्ये सिमकार्ड हे आलंच. सीमकार्ड शिवाय मोबाईलचा वापर शक्यच नाही. आत्तापर्यंत तुम्ही अनेक सिमकार्ड बघितली असतील किंवा घेतली असतील. परंतु तुम्हाला ई-सिम कार्ड (E-Sim) माहित आहे का? नसेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आजकाल सर्वत्र ई-सिम कार्डची चर्चा आहे. परंतु तुमच्या मोबाईलसाठी हे सिम वापरता येत का? त्याचा वापर कसा करण्याचा याबाबत संपूर्ण माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ई-सिम म्हणजे काय ?

ई-सिम म्हणजे एम्बेडेड सबस्क्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल.. तुम्ही हे सिमकार्ड पाहू शकत नाही. इ सिम हे एक व्हर्च्युअल सिम आहे जे फिजिकल सिमपेक्षा पूर्णपणे वेगळे असते. तुम्ही हे सिम खरेदी केल्यांनतर तुम्हाला ते मोबाईल मध्ये टाकावं लागत नाही. हे टेलिकॉम कंपनीद्वारे ओव्हर-द-एअर ऍक्टिव्हेट केले जाते. नॉर्मल सिम कार्डमध्ये ज्या काही सुविधा असतात त्या सर्व सुविधा तुम्हाला इ सिम मधेही मिळतात.

E-Sim चे फायदे काय आहेत?

ई-सिमचे फायदे सुद्धा अनेक आहे. हे सिम मोबाईलच्या हार्डवेअरमध्येच असते. त्यासाठी वेगळा सिम ट्रे बनवण्याची गरज कंपनीला लागत नाही. त्यामुळे मोबाईलची जागा वाचते. ई सिम वापरण्यासाठी मोबाईल मध्ये ड्युअल सिम सुविधा असणे आवश्यक आहे. ई- सिमचा अजून एक फायदा म्हणजे यूजर्स त्यांच्या फोनमध्ये एक किंवा त्यापेक्षा अधिक सिम वापरू शकतील.

E-Sim चे तोटे –

समजा एखाद्या वेळेला जर तुमचा स्मार्टफोन अचानक बंद पडला, तर तुम्ही नॉर्मल सिम असेल तर ते काढून दुसऱ्या मोबाईल मध्ये टाकता, परंतु ई- सीम काढून इतर कोणत्याही मोबाईल मध्ये टाकता येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जे यूजर्स वेगवेगळे मोबाईल वापरतात त्यांच्यासाठी नॉर्मल सिम कार्ड बदलने सोपे राहते परंतु E-Sim कार्ड फोनच्या मदरबोर्डमध्ये एम्बेड केलेले असल्यानेमुळे ते सतत बदलता येत नाही.

कोणत्या मोबाइलला मिळते E-Sim ची सुविधा-

भारतात JIO, AIRTEL आणि VI इ सिम ची सुविधा देतेय. Apple चे iPhone 14 आणि iPhone 14 Pro, सॅमसंग आणि मोटोरोलाच्या काही ठराविक मोबाईल मध्ये E-Sim ची सुविधा देण्यात आली आहे.

ई-सिम कार्ड कसे खरेदी करावे?

तुम्ही सुद्धा ई-सिम कार्ड खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला नेटवर्क ऑपरेटरकडे जावे लागेल. या व्यतिरिक्त, तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा वेबसाइटवरून किंवा अनुप्रयोगाद्वारे ई-सिम कार्ड देखील खरेदी करू शकता.