नवी दिल्ली । नोकरी करणाऱ्या अनेक लोकांना ग्रॅच्युइटी (Gratuity) बद्दल व्यवस्थित माहिती नसते. नुसतेच नाव ऐकले जाते. परंतु कर्मचार्यांसाठी हा एक महत्त्वाचा फंड आहे. वास्तविक, कंपनीने कर्मचार्यांना वर्षानुवर्षे काम केल्याच्या बदल्यात दिलेली भेट म्हणजे “ग्रॅच्युइटी”. ग्रॅच्युइटीचा एक छोटासा भाग कर्मचार्याच्या पगारामधून कट केला जातो, परंतु मोठा भाग कंपनीकडून दिला जातो.
अशा प्रकारे समजून घ्या
बरेच दिवस काम करून कर्मचारी जेव्हा कंपनी सोडून जातो, तेव्हा त्याला पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधी व्यतिरिक्त ग्रॅच्युइटी देखील दिली जाते.
सामान्यत: ग्रॅच्युइटी रिटायरमेंट नंतर मिळते, परंतु जर आपण नोकरी बदलत असाल किंवा मध्येच सोडत असाल तर आपण काही अटी पूर्ण केल्यावरही ग्रॅच्युइटी आधीच घेऊ शकता.
4 वर्षे, 10 महिने, 11 दिवस :
जर कर्मचाऱ्याने नोकरीच्या काही अटी पूर्ण केल्या तर एखाद्या विहित सूत्रानुसार त्याला ग्रॅच्युइटीची भरपाई करण्याची हमी दिली जाईल.
पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी अॅक्ट, 1972 नुसार, 4 वर्ष, 10 महिने, 11 दिवस सेवेत सतत काम केलेल्या कोणत्याही कर्मचार्यास ग्रॅच्युइटी दिली जाते.
कारण केवळ पाच वर्षांच्या सेवेनंतर कोणताही कर्मचारी कायद्याने ग्रॅच्युइटीचा हक्कदार ठरतो. सध्याच्या सिस्टीमनुसार, एखाद्या व्यक्तीने कमीतकमी 5 वर्षे एखाद्या कंपनीत काम केले असेल तर त्याला ग्रॅच्युइटीचा अधिकार मिळतो.
पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी अॅक्ट, 1972
पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी अॅक्ट, 1972 च्या अंतर्गत हा लाभ ज्या संस्थेमध्ये 10 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात अशा प्रत्येक कर्मचाऱ्यास उपलब्ध आहे.
जर कर्मचारी नोकरी बदल असेल, रिटायरमेंट घेत असेल किंवा कोणत्याही कारणास्तव नोकरी सोडत असेल, आणि तो ग्रॅच्युइटीचे नियम पूर्ण करत असेल तर त्याला ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो.
ग्रॅच्युइटीची गणना :
जर आपल्याला ग्रॅच्युइटीची गणना करायची असेल तर आपल्याला मागील पगाराबद्दल आणि सेवेच्या कालावधीबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.
ग्रॅच्युइटी काढण्यासाठीचा फॉर्म्युला = (15 X मागील पगार X कामाचे तास) / 26
येथे मागील पगाराचा अर्थ म्हणजे बेसिक पगार, महागाई भत्ता आणि विक्रीवरील कमिशन.
समजा, तुमचा मागील पगार दरमहा 60,000 रुपये आहे आणि तुम्ही कंपनीत सलग 12 वर्षे काम केले असेल तर तुमच्या ग्रॅच्युइटीची गणना अशाप्रकारे करता येईल
ग्रॅच्युइटी = (15 X 60,000 X 12) / 26 = 4,15,385 रुपये
म्हणजेच 12 वर्षांची सेवा केल्यानंतर तुमची ग्रॅच्युइटी 4,15,385 रुपये होईल.
ग्रॅच्युइटी वर टॅक्स लावला जातो का?
आयकर कायद्याच्या कलम 10 (10) नुसार कंपनी किंवा कोणत्याही संस्थेकडून कर्मचार्यांच्या ग्रॅच्युइटी म्हणून मिळालेली 20 लाखांपर्यंतची रक्कम टॅक्स फ्री आहे. यापूर्वी 10 लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्युइटी टॅक्स फ्री होती.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा