हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल आपण जर पाहिले तर समाजात घटस्फोट घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील एकमेकांपासून वेगळे होताना दिसत आहे. वर्षांनुवर्ष एकत्र संसार करून एकत्र आयुष्य घालून देखील घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढत आहे. आजकाल घटस्फोटापेक्षा ग्रे डिव्होर्स हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. जे लोक 50 वर्षे किंवा त्याहून जास्त वयानंतर घटस्फोट घेतात. त्यांच्यासाठी ग्रे डिव्होर्स हा शब्द वापरला जातो. आणि या घटस्फोटाची अनेक कारणे देखील आहेत. वयाची 50 वर्षे पूर्ण होईपर्यंत जर एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती सोबत राहत नसेल, तर त्यानंतर नक्की कोणत्या गोष्टी घडतात त्यामुळे त्यांना घटस्फोट घ्यावा लागतो हे आज आपण जाणून घेणार आहोत.
आजकाल प्रत्येक स्त्री आणि पुरुष हा वैयक्तिकरित्या काम करत आहेत. लग्न हे प्रत्येक स्त्री आणि पुरुषांमध्ये एक पवित्र बंधन आहे. एक मोठी कमिटमेंट असते. परंतु कधी कधी या प्रेमासोबत छोटे-मोठे वादही होतात. आणि वादाचे रूपांतर खूप मोठ्या भांडणात होतात. आणि एकमेकांवरचा विश्वास कमी होऊन नाते कमकुवत होते. आणि अनेक वेळा हे भांडण घटस्फोटापर्यंत जाते. परंतु तरुण वयामध्ये या गोष्टी घडतात परंतु आजकाल वृद्ध जोडप्यांमध्ये देखील हा घटस्फोट होण्याचे प्रमाण वाढत आहे. अनेक वर्ष एकत्र राहून देखील एकमेकांपासून वेगळे राहतात. ज्या जोडप्याचे वय 50 पेक्षा जास्त आहे. ते घटस्फोट घेतात त्यांना ग्रेड डिव्होर्स असे म्हणतात.
परंतु कोणतीही गोष्ट घडता सुरुवातीच्या टप्प्यात त्याची काही लक्षणे दिसत असतात. ग्रे डिव्होर्समध्ये ही अशीच काही लक्षण आहेत. ती म्हणजे आजकाल कम्युनिकेशनचा गॅप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. लोकांमध्ये दुरावा निर्माण झालेला आहे. आणि या गोष्टींमुळेच घटस्फोटासारखे प्रकार आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात घडून येत आहेत. आजकाल लोकांची जीवनशैली बदललेली आहे. त्यामुळे अनेक लोक हे वैयक्तिक आनंदाला जास्त महत्त्व देतात. आणि म्हणूनच समोरच्या पार्टनरच्या अपेक्षा लक्षात न घेता प्रत्येकजण त्याच्या आनंदाप्रमाणे वागत असतो.
आजकाल जर आपण पाहिले तर विचारांमध्ये खूप मोठी तफावत निर्माण झालेली आहे. अनेक वर्ष एकत्र राहून देखील अनेक जोडप्यांमध्ये अजूनही त्यांचे वैचारिक बंध जुळलेले नाही. आणि उतार वयामध्ये त्यांच्यातील पहा वैचारिक कलह वाढल्यामुळे घटस्फोट घेण्याचे प्रमाण देखील वाढलेले आहे. अनेक लोकांमध्ये आर्थिक समस्या देखील असतात. जे त्यांच्या विवाहावर परिणाम करतात. आणि म्हणूनच घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढलेले आहे.
उतारवयासोबत माणसाला अनेक आजार देखील निर्माण होतात. अशातच स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी देखील उतार वयामध्ये लग्न मोडण्याचे प्रमाण वाढलेले आहे. अनेक वेळा काही जोडप्यांना मुले होत नाहीत. आणि उतार वयामध्ये त्यांना एकमेकांबद्दल असणारे प्रेम हळूहळू कमी होते. त्यामुळे देखील घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढले आहे.