अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या

Lionel Messi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Lionel Messi : गेल्या महिन्याभरापासून कतारमध्ये सुरु असलेल्या फुटबॉल विश्वचषकाचा आज अंतिम आहे. मात्र जगभरातील फुटबॉल रसिकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असेल. अर्जेंटिनाचा हा फुटबॉलपटू मैदानावर जितका जबरदस्त आहे, तितकीच मैदानाबाहेरील त्याची जीवनशैली देखील चमकदार आहे. हे लक्षात घ्या कि, अर्जेंटिनाचा हा स्टार खेळाडू जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू आहे. क्लब आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांद्वारे होणाऱ्या कमाईसोबतच त्याला जाहिरातींद्वारेही मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतात.

Lionel Messi Net Worth 2022: Paris Saint-Germain Salary, How Much He Makes | StyleCaster

एका मीडिया रिपोर्ट मधील माहितीनुसार, मेस्सीची एकूण संपत्ती 600 लाख डॉलर्स म्हणजे सुमारे 4952 कोटी रुपये आहे. तसेच मेस्सी दररोज सुमारे $1,05,000 ची कमाई करतो. अर्जेंटिनाचा हा स्टार खेळाडू सहसा शो-बिझपासून दूर राहत असल्याचे दिसून येते, मात्र याचा अर्थ तो लक्झरी लाईफस्टाईल जगत नाही असे नाही. हे लक्षात घ्या कि, अर्जेंटिनाच्या नो फ्लाय झोनमध्ये बंगला असलेल्या Lionel Messi कडे अनेक आलिशान घरे आहेत. मेस्सीकडे जगभरात मिळून एकूण 234 कोटी रुपयांची घरे आहेत. तसेच त्याच्याकडे एक खाजगी जेट आहे ज्याची किंमत सुमारे 100 कोटी रुपये आहे. 16 लोकांसाठी बसण्याची व्यवस्था असलेल्या या जेलमध्ये एक किचन देखील आहे. यासोबतच मेस्सी एका हॉटेलचा मालकही आहे.

Lionel Messi - 7 Ballon d'Or Wins - Official Tribute | Lionel messi, Messi 7, Messi

एकूण कमाई किती ???

फोर्ब्सने जाहीर केलेल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या लिस्टमध्ये Lionel Messi पहिल्या क्रमांकावर आहे. फोर्ब्स मासिकाने जाहीर केलेल्या नुसार, मेस्सी दरवर्षी सुमारे $130 लाख (सध्याच्या विनिमय दरानुसार 1075 कोटी रुपये) ची कमाई करतो. ब्रँड एंडोर्समेंटमधून यातील मोठी रक्कम येते. तसेच एथलेटिक्स-संबंधित कार्यक्रमांमधून $55 लाख वेगळी कमाई होते. हे लक्षात घ्या कि, पॅरिससाठी खेळण्यासाठी जेव्हा त्याने बार्सिलोना सोडले तेव्हा त्याला दिवसाला सरासरी 22 लाख डॉलर्स मिळाले. ही रक्कम बार्सिलोनाकडून खेळताना मिळालेल्या रकमेपेक्षा कमी होती.

Messi, íntimo: los “errores de los argentinos”, la crianza de sus hijos, la vida en Barcelona y más - AS Argentina

मेस्सीच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घ्या

मेस्सीचे पूर्ण नाव लिओनेल आंद्रेस मेस्सी असे आहे. आपल्या बालपणीच्या मैत्रिणीशी Lionel Messi ने लग्न केले असून त्याच्या पत्नीचे नाव अँटोनेला रोकुझो आहे. तसेच त्यांना तीन मुले देखील आहेत. आपल्या कारकिर्दीत त्याने 85 हून जास्त गोल केले आहेत. यासोबतच त्याने विक्रमी 7 वेळा बेलेन डी’ओर पुरस्कार देखील मिळवला आहे. मेस्सी हा आतापर्यंतच्या 5 सर्वोत्तम फुटबॉल खेळाडूंपैकी एक मानला जातो. यापुढे मेस्सी आता पॅरिस सेंट-जर्मेन या क्लबसाठी फुटबॉल खेळताना दिसणार आहे. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवात बार्सिलोनामधून करणारा मेस्सी अनेक वर्षे

Lionel Messi Officially Signs With Paris Saint-Germain | Hypebeast बार्सिलोनाकडूनच खेळत होता.

आज खेळणार शेवटचा सामना

हे जाणून घ्या कि, आजचा सामना हा Lionel Messi चा शेवटचा विश्वचषक आणि आंतरराष्ट्रीय सामना असेल. आज विश्वचषकाच्या या अंतिम सामन्यात अर्जेंटिना फ्रान्सला टक्कर देणार आहे. अर्जेंटिनाचा कर्णधार असलेला लिओनेल मेस्सी जर आज आपल्या संघासाठी हे विजेतेपद मिळवण्यात यशस्वी ठरला तर अर्जेंटिना तिसऱ्यांदा फिफा विश्वचषकाची ट्रॉफी आपल्या नावावर करेल.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.fifa.com/tournaments/mens/worldcup/qatar2022

हे पण वाचा :
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
आपल्यालाही SBI खात्यातून पैसे कट झाल्याचा एसएमएस मिळाला आहे ??? जाणून घ्या यामागील कारण
Post Office च्या स्कीममध्ये अशा प्रकारे गुंतवणूक करून मिळवा 51 लाख रुपये
Business Idea : ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरु करून अशा प्रकारे दरमहा मिळवा हजारो रुपये