हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेमध्ये पहिल्यांदा Money Laundering ही संज्ञा वापरली गेली. असे म्हणतात की, इथले माफिया चुकीच्या मार्गाने कमावलेल्या आपल्या पैशांना अनेक मार्गांनी कायदेशीर पैशांत रूपांतर करायचे. ज्यामुळे मनी लाँड्रिंग हे नाव पुढे आले. लाँड्रिंग म्हणजे काळा पैसा पांढरा करण्यासाठी वापरली जाणारी पद्धत. सुरुवातीला माफियांपासून सुरू झालेली ही पद्धत नंतर अनेक व्यापारी, राजकारणी आणि नोकरशहांकडून वापरली जाऊ लागली. यामध्ये पैसे लाँडर करणाऱ्या व्यक्तीला लांडरर असे म्हंटले जाते.
हे काम अनेक प्रकारे केले जाते. यामध्ये, काळा पैसा पांढरा करून यामध्ये काही टक्क्यांची कपात करून पुन्हा त्याच्या मूळ मालकाकडे परत केला जातो. Money Laundering ही काळा पैसा पांढरा करण्यासाठीची एक प्रक्रिया आहे. मात्र ते कसे केले जाते हे जाणून घेउयात…
बनावट कंपन्या
आपण कधीतरी शेल कंपन्यांबाबत ऐकले असेलच. हे लक्षात घ्या कि, या बनावट कंपन्या असतात. अनेकदा त्याची नोंद फक्त कागदोपत्रीच असते. ज्यामध्ये कोणतेही भांडवल गुंतवलेले नसते कि यामध्ये प्रत्यक्षात कोणते काम देखील केले जात नाही. याद्वारे काळा पैसा पांढरा करून मूळ मालकाकडे परत केला जातो. काळ्या पैशाला कायदेशीर बनवण्यासाठी हा मार्ग सर्वात जास्त वापरला जातो. Money Laundering
मालमत्तांमध्ये गुंतवणूक
एखाद्या व्यक्तीला सरकारकडून स्वस्तात जमीन उपलब्ध करून दिल्याचे अनेकदा ऐकायला मिळते. याबाबत प्रश्न देखील उपस्थित केले जातात. वास्तविक, Money Laundering मध्येही असेच केले जाते. जिथे कागदोपत्री स्वस्त दरात महागडी जमीन, घर, दुकानांची खरेदी केली जाते जेणेकरून त्यावर कमी टॅक्स द्यावा लागू शकेल.
बँकेमध्ये डिपॉझिट
याबरोबरच अनेकदा लॉन्डररकडून असे पैसे गोळा करून एका अशा देशाच्या बँकेमध्ये जमा केले जातात जिथे त्या देशाच्या सरकारला याबाबत चौकशी करण्याचा अधिकार नसतो. या ठिकाणांना सेफ हेवन म्हंटले जाते. काही दिवसांपूर्वीच गाजलेले पनामा प्रकरणही असेच होते. कारण यामध्ये अनेक मोठ्या व्यक्तींचा येथील बँकांमध्ये काळा पैसा असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या बाबतीत स्विस बँक सर्वाधिक चर्चेत असते. Money Laundering
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://dea.gov.in/sites/default/files/moneylaunderingact.pdf
हे पण वाचा :
Bank Loan : नवीन वर्षात ‘या’ दोन बँकांनी ग्राहकांना दिला मोठा झटका, आता कर्ज घेणे महागले
‘या’ Post Office योजनेमध्ये गुंतवणूक करून दरमहा मिळवा 2500 रुपये
New Business Idea : टोमॅटो केचपच्या व्यवसायाद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न
Indian Overseas Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, जाणून घ्या नवीन दर
Train Cancelled : आज रेल्वेकडून 261 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा