सोशल मीडियावर Photo Lab अ‍ॅपचा धुमाकूळ; १० कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलं डाउनलोड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । गेल्या काही दिवसांपासून भन्नाट अशा Photo Lab या अ‍ॅपला लोकांनी चांगलीच पंसती दर्शवली आहे. अल्पवधीतच लोकप्रीय झालेल्या या अ‍ॅपमध्ये फोटो एडिटिंगचे ९०० पेक्षा जास्त पर्याय उपलबद्ध आहेत. Photo Lab हे अ‍ॅप व्हायरल होत असून प्रत्येकजण डाउनलोड करत आहे. या अ‍ॅपचे फोटो एडिटिंग टूल्स आणि फिल्टर्स इतर अ‍ॅपच्या तुलनेत भन्नाट आहेत. यामधील कार्टून लूक असेललं फिल्टर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. त्यासोबतच फोटो फ्रेम, एनिमेटेड इफेक्ट्स यासारखे अनेक टूल्स आहेत. सध्या Facebook, Whatsapp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर Photo Lab या अ‍ॅपचा वापर करून कार्टून किंवा पेंटींग असलेले स्वतःचे फोटो अनेकजण पोस्ट करत आहेत.

सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या Photo Lab अ‍ॅपला अल्पावधीतच १० कोटींपेक्षा जास्त जणांनी डाउनलोड केलं आहे. अँड्रॉइडसह आयओएस (IOS) प्लॅटफॉर्मवरही हे अ‍ॅप उपलबद्ध आहे. Photo Lab अ‍ॅपला गूगल (Google) प्ले स्टोर (Play Store) आणि अ‍ॅपल (Apple) अ‍ॅप स्टोर (APP Store)मधून डाउनलोड करु शकता.Photo Lab हे एक मोफत अ‍ॅप आहे. या मोफत अ‍ॅपमध्ये वापरकर्त्यांना बेसिक अ‍ॅप फिचर मिळतात. यापेक्षा चांगले फिचर्स हवे असतील तर प्रिमियम व्हर्जन अ‍ॅप घ्यावं लागेल. फोटो लॅब या अ‍ॅपचे प्रिमियम व्हर्जन तीन दिवसांसाठी मोफत असून त्यानंतर ३२० रुपयांचं शुल्क भारवं लागेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”