हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजचे दिनविशेष | आज दि. २१ फेब्रुवारी २०२०. प्रत्येक दिवस काहीतरी खास आठवणी घेऊन येत असतो. काही आठवणी इतिहास बनून जातात तर काही लोकांना माहिती म्हणून उपयोगी पडतात. अशाच काही दिनविशेषांवर एक नजर..
विशेष – जयश्री गडकर – जन्म – २१ फेब्रुवारी २०२० – मराठी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून कामाला सुरुवात. आपल्या ५० वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत २५० हून अधिक चित्रपटांत यशस्वी व्यक्तिरेखा साकारल्या. सांगत्ये ऐका, साधी माणसं, पाटलांची सून, एक गाव बारा भानगडी, घरकुल, थांब लक्ष्मी, कुंकू लावते अशा चित्रपटांमध्ये काम. रामानंद सागर यांच्या रामायणात – रामाची आई – कौसल्येची भूमिका. याशिवाय बुगडी माझी सांडली ग, पदरावरती जरतारीचा मोर, ऐरणीच्या देवा तुला या गाण्यांमधूनही महाराष्ट्राला परिचित
आता बाकी घडामोडी..
१) १८२९ – ब्रिटिशांच्या विरोधात लढणारी पहिली भारतीय स्त्री – राणी चेन्नमा यांचं निधन
२) १८९४ – रसायनशास्त्रज्ञ शांतिस्वरूप भटनागर यांचा जन्म
३) १८९९ – ‘निराला’ या नावाने प्रसिद्ध असणारे कवी, कथा-कादंबरीकार सूर्यकांत त्रिपाठी यांचा जन्म
४) १९९३ – बंगाली क्रांतिकारक वीरेंद्रनाथ फासावर
५) १९४१ – इन्शुलिनचे संस्थापक सर फ्रेडरिक ग्रँट बेटिंग यांचं निधन
६) १९३२ – आचार्य विनोबा भावेंकडून धुळ्याच्या तुरुंगात गीताप्रवचनांना सुरुवात
७) १९७२ – महाराष्ट्र बँकेचे संस्थापक सदस्य, खासदार आणि घटना समितीतील एक सदस्य भालचंद्र बापूसाहेब गुप्ते यांचं निधन
८) १९९१ – सुप्रसिद्ध हिंदी अभिनेत्री नूतन हिचे निधन
९) २०१४ – सरकारविरोधी निदर्शनात झालेल्या गोळीबारात मिस व्हेनेझुएला ग्रेनसिस कार्मोना मृत्युमुखी
१०) साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त उडिया कवी राधामोहन गरनाथक यांचं निधन