काय आहे मुहूर्त ट्रेडिंगचा इतिहास??

muhurta trading
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळी सणामध्ये रांगोळी काढणे, फराळ बनवणे, देवी देवतांची पूजा करणे ही आजवर चालत आलेली संस्कृती आणि परंपरा आहे. दिवाळीमध्ये आणखीन एक परंपरा राबवली जाते ती म्हणजे मुहूर्त ट्रेडिंगची. दिवाळी दिवशी मुहूर्त ट्रेडिंग परंपरेनुसार, नविन गुंतवणूकदार, व्यापारी व्यवहार करण्यात येतात. मुहूर्त ट्रेडिंगमध्येच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यात येते. मुहूर्त ट्रेडिंगची वेळ संध्याकाळची असते. ही वेळ व्यापाऱ्यांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी सर्वात महत्त्वाचे असते. त्यामुळे आज आपण याच मुहूर्त ट्रेडिंग परंपरेचा इतिहास जाणून घेणार आहोत.

मुहूर्त ट्रेडिंग परंपरेचा इतिहास

तसे पाहायला गेलो तर मुहूर्त ट्रेडिंग परंपरा ही गेल्या अनेक वर्षांपासून चालत आली आहे. असे म्हणतात की या परंपरेला राजा विक्रमादित्यच्या काळात सुरुवात करण्यात आली होती. आपल्या राज्याची आर्थिकदृष्ट्या भरभराट व्हावी, गोरगरिबी दूर व्हावी यासाठी विक्रमादित्याने या परंपरेला सुरुवात केली होती. यानंतर या परंपरेचा मान पुढे देखील राखण्यात आला. 1957 ला बाँबे स्टॉक एक्सचेंजने मुहूर्त ट्रेडिंग अधिकृतरीत्या सुरू केली. यानंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्येही देखील मुहूर्त ट्रेडिंग सुरू झाले. तेव्हापासून ते आजवर ही परंपरा चालत आली आहे. (Diwali Muhurat Trading)

मुहूर्त ट्रेडिंग प्रकार काय आहे?

दिवाळीच्या दिवशी शेअर बाजार बंद असतो. परंतु फक्त एका तासासाठी म्हणजेच मुहूर्त ट्रेनिंगमध्ये शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते. ट्रेडिंगच्या एका तासांमध्ये स्टॉक, डेरिव्हेटिव्हज, कमोडिटी यांच्यासाठी स्टॉटनुसार विभाजन केले जाते. मुहूर्ता ट्रेनिंग पूर्वी पूजा पठण असले देखील करण्यात येते. मुहूर्त ट्रेनिंगमधूनच आर्थिक वर्षाची सकारात्मक सुरुवात करण्यात येते. मुहूर्त ट्रेडिंगमध्ये पूर्ण वर्षांचा ट्रेंड ठरवला जातो.