हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 1 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले अर्थसंकल्प म्हणजेच बजेट (Budget 2024) अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार आहेत. निर्मला सीतारमण या भाजप सरकारमध्ये अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत. आता पुन्हा एकदा देशाचे अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. त्यामुळे निर्मला सीतारमण या नेमक्या कोण आहेत? त्यांचे काम काय असते? मुळात त्यांची संपत्ती किती आहे? त्यांना पगार किती आहे? असे अनेक प्रश्न विचारण्यात येत आहेत. आज आपण याचविषयी जाणून घेणार आहोत.
निर्मला सितारामन यांच्याविषयी.. (Budget 2024)
तर 1 फेब्रुवारी रोजी निर्मला सीतारमण सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प (Budget 2024) सादर करणार आहेत. यंदा त्या 2024-25 मध्ये पहिले अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. भाजप पक्षाने 2019 साली सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकल्यानंतर निर्मला सीतारामन या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री राहिल्या आहेत. त्यापूर्वी त्या लंडनमधील हॅबिटॅट सेंटरमध्ये सेल्सपर्सन म्हणून काम करत होत्या. त्यानंतर त्यांनी असोसिएशन ऑफ ॲग्रिकल्चरल इंजिनीअर्स याठिकाणी अर्थशास्त्रज्ञांची असिस्टंट म्हणून काम पाहिले.
सीतारमण यांची संपत्ती किती?
आजवर त्यांनी कोणतीही कर बचत योजनेत गुंतवणूक केलेली नाही. निर्मला सीतारमण यांची फक्त 4 बँक खाती आहेत. या खात्यावरची रक्कम सुमारे 8 लाख 44 हजार 935 रुपये इतकी आहे. सीतारमण आणि त्यांच्या पतीचे संयुक्त भागीदारीत 99.36 लाख रुपयांचे घर आहे. तसेच, 16.02 लाख रुपयांची जमीन आहे. तसेच त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक देखील केलेली आहे.
सीतारमण यांचा पगार किती?
इंडियन गव्हर्मेंटच्या माहितीनुसार अर्थमंत्र्यांचे मासिक वेतन सुमारे 4,00,000 रूपये इतके असते. त्यानुसार, निर्मला सीतारमण यांचे देखील वेतन 4,00,000 इतके आहे. याबरोबर त्यांना सरकारकडून वेगवेगळ्या सोयी सुविधा देखील मिळतात.