हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज RBI कडून रेपो दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. अनेक तज्ञ रेपो दरात वाढ होण्याची अपेक्षा करत होते. रिझव्र्ह बँकेचे पहिले उद्दिष्ट महागाई नियंत्रित करणे आहे.ज्यामुळे रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्सने (0.50 टक्के) वाढ केली गेली. रेपो रेट हा असा दर आहे ज्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून इतर बँकांना शॉर्ट टर्म साठी फंडस् दिले जातात.
यापूर्वी मे 2022 मध्ये देखील RBI ने अचानक रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली होती, तर जून 2022 झालेल्या MPC बैठकीनंतर 0.40 टक्क्यांनी वाढ केली गेली होती. अशाप्रकारे मे महिन्यापासून रेपो दरात एकूण 1.40 टक्के वाढ झाली आहे.
भविष्यात रेपो दरात आणखी वाढ केली जाऊ शकेल
दास यांच्या आजच्या भाषणातून काढलेला मुख्य निष्कर्ष म्हणजे उच्च चलनवाढीमुळे अर्थव्यवस्था अस्थिर होऊ शकते. या व्यतिरिक्त, अनुकूल धोरणे मागे घेण्याकडेही लक्ष दिले पाहिजे. याचाच अर्थ असा कि, यापुढे देखील आणखी दर वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
सलग दुसऱ्या तिमाहीत महागाई 6 टक्क्यांच्या वर आहे. तिसऱ्या तिमाहीतही असेच सुरु राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. अशा परिस्थितीत एमपीसीला जनतेचा रोषाचा सामना करावा लागतो आहे. यामुळे आता एमपीसीला पत्र लिहून देशाच्या संसदेला ते महागाई का आटोक्यात आणू शकले नाहीत याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागेल. एमपीसीला महागाई 2 ते 6 टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याचा आदेश आहे. त्यानुसार एमपीसीला फारसे यश मिळू शकलेले नाही. महागाई अजूनही वाढतच आहे.
महागाईसाठी बाह्य घटक जबाबदार
RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मान्य केले आहे की,” देशा बाहेरील परिस्थितीमुळे महागाईला तोंड देणे अवघड जात आहे.” ते पुढे म्हणाले की,” दुर्दैवाने आपण बाह्य घटकांवर नियंत्रण ठेवू शकत नाही.” कमोडिटीच्या उच्च किंमती आणि कमकुवत झालेला रुपया या गोष्टी बाह्य जोखमींच्या लिस्टमध्ये वरच्या स्थानावर आहेत. तसेच जागतिक स्तरावरील वाढत्या व्याजदरांमुळे उदयोन्मुख बाजारपेठा आणि प्रमुख अर्थव्यवस्थांमधील व्याजदरातील फरक कमी झाला आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा मार्केटमध्ये भांडवल येणे सुरू झाले आहे. मात्र रशिया-युक्रेनमधील युद्ध ही आणखी एक चिंता असेल.”
आता पुढे काय ???
RBI कडून सुरू केले गेलेले हे दर वाढीचे सध्याचे चक्र सध्या तरी संपल्याचे दिसत आहे. मात्र जागतिक अर्थव्यवस्था कोणत्या दिशेने जाईल आणि युक्रेनमधील रशियन युद्धाची दिशा यावर महागाईचे भविष्य अवलंबून असेल. RBI ला दुहेरी लढाईला तोंड द्यावे लागते आहे. RBI ला उच्च चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच चलनात होणारी घसरणही हाताळावी लागेल. मात्र, मुख्यतः बाह्य घटकांमुळे उद्भवलेल्या दुहेरी आव्हानांना तोंड देण्यासाठी RBI कडे मर्यादित साधने आहेत.
RBI चे पहिले काम स्थिरता राखणे आहे. आता वेगाने आणि वारंवार दर वाढ करून महागाई नियंत्रणात ठेवायची आहे. मात्र मात्र साथीच्या आजारातून आपली अर्थव्यवस्था अजूनही पूर्णपणे सावरलेली नाही. त्यामुळे व्याजदर सारखा वाढवणे हे अर्थव्यवस्थेसाठी चांगले ठरणार नाही.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला द्या : https://www.rbi.org.in/
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात बदल !!! नवीन भाव तपासा
कर्ज आणखी महागणार!! रेपो रेट मध्ये पुन्हा वाढ
Airtel च्या ‘या’ 4 प्लॅन्समध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह मिळेल एका महिन्याची व्हॅलिडिटी !!!
PM Kisan मध्ये काही शेतकऱ्यांना पुढील हप्त्यात 2 हजारांऐवजी मिळतील 4 हजार रुपये !!!
ITR refund संबंधित महत्वाचे 5 नियम समजून घ्या !!!