हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या युगात मोबाईल हा अनेकांचा जीव कि प्राण आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत सर्वानाच मोबाईलचे वेड आहे. तसेच मोबाईल वरून अनेक कामे ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करता येत असल्याने माणसाच्या जीवनात त्याचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे. अशावेळी जर तुमचा मोबाईल कोणी चोरला किंवा कुठे गायब झाला तर? विचार करूनच भीती वाटली ना …. खरं तर मोबाईल चोरीला गेल्यावर अनेक विचार मनात येतात की डेटा लीक तर होणार नाही ना? अशा परिस्थितीत आपण शक्यतो पोलिसांत तक्रार दाखल करतो. पण एका आयपीएस अधिकाऱ्याने अशी पद्धत सांगितली आहे, ज्याद्वारे जरी समजा चोरट्याने तुमचा मोबाईल चोरला तरी त्याला तुम्हाला तो मागे करावा लागेल.
IPS अधिकारी अशोक कुमार यांनी याबाबत एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती ट्विटरवर शेअर केली आहे . समजा आपला मोबाईल चोरीला गेला तर नेमकं काय करावं ? यावर त्यांनी म्हंटल आहे कि, सर्व प्रथम, काळजी करू नका. तुम्ही तुमच्याकडे वेळ नसेल आणि तुम्ही पोलिसांकडे जाऊ शकत नसाल तर ही माहिती तुमच्या नक्कीच उपयोगास येईल. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि तुमची तक्रार नोंदवा.
???? मेरा मोबाइल गुम हो गया है! ????
सबसे पहले, चिंता न करें। यदि आपके पास समय की कमी है और आप पुलिस के पास नहीं जा सकते हैं, तो यह जानकारी आपके बहुत काम आएगी।
इस चोरी की शिकायत के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और अपनी शिकायत दर्ज करें। इससे चोर आपके मोबाइल का उपयोग नहीं कर… pic.twitter.com/0hWAvPgade
— Ashok Kumar IPS (@AshokKumar_IPS) June 6, 2023
काय आहे व्हिडिओत –
अशोक कुमार यांनी शेअर केलेला विडिओ ४५ सेकंदांचा आहे. तुमचा चोरीला गेलेला मोबाईल कसा ब्लॉक करायचा? सर्वात अगोदर मोबाईलचे बिल आणि तुम्ही लिहिलेल्या तक्रारीची एक प्रत घ्या. मोबाईलचा IMEI नंबरही नोंदवून घ्या. यानंतर विडिओ मध्ये नमूद केलेल्या वेबसाइटवर जा. यानंतर, हरवलेला मोबाइल ब्लॉक करण्याचा पर्याय निवडा. तेथे तुम्हाला एक फॉर्म मिळेल, ज्यामध्ये फोनशी संबंधित सर्व डिटेल्स मगतीतले जातील. ती सर्व माहिती व्यवस्थित भरा. मग बाकीचे काम पोलीस आणि टेहळणी पथकाचे आहे.
दरम्यान, अशोक कुमार यांनी शेअर केलेले हे ट्विट चांगलंच व्हायरल झालं आहे. आत्तापर्यंत या व्हिडिओला 4 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेकांनी त्यावर जोरदार कमेंट्स सुद्धा केल्या आहेत. जर चुकून तुमचाही मोबाईल हरवला किंवा कोणी चोरी केला तर अशोक कुमार यांनी सांगितलेली ट्रिक तुम्ही वापरू शकता.