नवी दिल्ली । अनेक लोकांचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ATM मशीनमध्येच अडकल्याचे तुम्ही ऐकले असेलच. अशी परिस्थिती कोणावरही ओढावू शकते, अगदी तुमच्यावरही. जेव्हा अनेक लोक अशा अडचणीत सापडतात तेव्हा ते खूप अस्वस्थ होतात. या अडचणीचे कारण म्हणजे त्यांना कार्ड परत कसे मिळवायचे हे माहित नसते. जर तुम्हाला कार्ड परत कसे मिळवायचे हे माहित असेल तर तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही. या बातमीत आम्ही तुम्हाला याबद्दलची माहिती देणार आहोत-
‘या’ कारणांमुळे ATM कार्ड अडकू शकेल
तुमचे ATM कार्ड मशीनमध्ये का अडकते हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे. खालील कारणांमुळे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ATM मशीनमध्येच अडकू शकते-
– आपण बऱ्याच वेळेनंतर आपले डिटेल्स एंटर केल्यास
– तुम्ही अनेक वेळा चुकीची माहिती एंटर केल्यास
– पॉवर कनेक्शनमध्ये अडचण आल्यास आणि वीज गेल्यास
– इतर तांत्रिक समस्या
– सर्व्हरशी कनेक्शनमधील प्रॉब्लम
कार्ड परत कसे मिळवायचे ?
जर तुमचे डेबिट कार्ड ATM मशिनमध्ये अडकले तर तुम्ही ताबडतोब बँकेला कळवावे. तुम्ही बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करून हे कोणत्या शहरात आणि कोणत्या मशीनवर (म्हणजे ठिकाण) घडले आहे ते सांगावे.
जर ते ATM त्याच बँकेचे असेल ज्यामध्ये तुमचे खाते आहे, तर तुम्हाला तुमचे कार्ड अगदी सहज परत मिळेल. मात्र जर तुम्ही दुसऱ्या बँकेच्या ATM मधून पैसे काढण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला काही त्रासाला सामोरे जावे लागू शकते.
कस्टमर केअर सर्व्हिस दोन पर्याय देईल
तुम्ही कस्टमर केअरला याबाबत सांगाल, तेव्हा तेथून तुम्हाला दोन पर्याय दिले जातील. पहिला पर्याय म्हणजे कार्ड कॅन्सल करणे. तुम्ही कार्ड कॅन्सल केल्यास, तुम्हाला पुन्हा कार्ड बनवावे लागेल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या कार्डचा गैरवापर होत असेल तर तुम्ही ते कॅन्सल केले पाहिजे. कार्ड कॅन्सल केल्यानंतर, तुम्हाला नवीन कार्डसाठी देखील अर्ज करावा लागेल. अर्ज केल्यानंतर 7 ते 10 दिवसांत नवीन कार्ड तुमच्या घरी पोहोचेल. तुम्हाला लवकरच हवे असल्यास, तुम्ही कार्डसाठी तुमच्या बँकेच्या शाखेला भेट देऊ शकता.
दुसऱ्या बँकेच्या ATM मध्ये अडकलेले कार्ड मिळववण्याचा दुसरा एक मार्ग आहे. खरं तर, सर्व बँका अडकलेली कार्डे ज्या बँकांमध्ये ती कार्ड जारी केली जातात त्यांना पाठवतात. म्हणजे ज्या बँकेचे कार्ड त्याच बँकेला उपलब्ध होतात. ते कार्ड तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेतून मिळवू शकता.