उन्हाळ्यात काय खावे अन् काय खाण्याचे टाळावे? चला जाणून घेऊया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उन्हाळा आला की सगळे लोक थंडावा मिळावा म्हणून म्हणून काय खायला पाहिजे याचा विचार करतात. उन्हाळ्यात शक्यतो हलके अन्न खाणे, जास्त पाणी पिने आवश्यक आहे. अन्यथा आपणास पचन संबंधित आजार उद्भवू शकतात. आज आपण जाणून घेऊया की उन्हाळ्यात नेमकं काय खावे आणि काय खाण्याचे टाळावे.

1) नारळपाणी-
उन्हाळ्यात आपण नारळ पाणी पिऊ शकता. नारळ पाणी पिल्याने आपल्या शरीरातील उष्णता कमी होते. सोबतच आपल्या पोटातील आम्लाची पातळी कमी होते.

2) दही-
उन्हाळ्यापासून संरक्षण आणि आपल्या शरीराला थंडावा मिळण्यासाठी दही सगळ्यात चांगला पदार्थ आहे. दह्यामुळे अन्न पचनासा मदत होते. आपणास जर रोज दही खायला कंटाळ येतो तर ताक पिणे गरजेचे आहे.

फळे आणि भाज्या-
उन्हाळ्या आला की कलिंगड, खरबूज, स्ट्रॉबेरी आणि पीच ही फळे बाजारात उपलब्ध असतात. ही फळे खाल्याने तुमच्या शरीरातील उष्णाता कमी होईल. भाज्यांमध्ये काकडी खाल्याने देखील शरीरातील उष्णता कमी होते.

काकडी, कांदा, कोथिंबीर, पुदिना, कलिंगड अशा जास्त प्रमाणात पाणी असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.

उन्हाळ्यात काय टाळावे?
कॅफीनेटेड, कार्बोनेटेड, अल्कोहोलिक पेय कमी प्यावे. या पदार्थांमध्ये प्रिझर्वेटिव्हज, कृत्रिम रंग व भरपूर साखर असते. त्यामुळे भूक मरते. काही वेळा डायल्युटेड फॉस्फरिक ऍसिडही आढळते, ज्याचा पचन संस्थेवर दुष्पपरिणाम होतो; तसेच किडनी स्टोन, दातांवर प्लाक तयार होणे असे आजार जडू शकतात. दातांच्या घनतेवरही परिणाम होऊ शकतो.

बाहेर मिळणारे गाडीवरचे गोळे, कुल्फी, पेप्सीकोला खाऊ नये.

गार पदार्थ मोठ्या प्रमाणावर खाऊ नयेत.

समोसा, कचोरी, फरसाण, बुंदी, चिप्स, भजी असे तळलेले पदार्थ खाऊ नयेत.

Leave a Comment