मुख्यमंत्रिपद मिळावं यात गैर काय? सुप्रिया सुळेंचा थेट सवाल,

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त एका मराठी वृत्तपत्रासाठी घेतलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी राजकारणातील अनेक पैलूंबाबत आपली मतं व्यक्त केली . यावेळी ‘मुख्यमंत्री पद मिळावे अशी प्रत्येकाची इच्छा असते यात गैर असं काहीच नाही’ असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.

मुलाखतीदरम्यान भविष्यात तुमचे राजकारण महाराष्ट्रात असणार का ? असा सवाल सुप्रिया सुळे यांना विचारला असता त्या म्हणाल्या, बारामतीतून निवडून आले आहे त्यामुळे महाराष्ट्रातून निवडून जात असल्यामुळे महाराष्ट्राशिवाय मला दिल्ली मिळणारच नाही’. असं सूचक वक्तव्य ही त्यांनी यावेळी केले आहे. महाराष्ट्र आहे म्हणूनच दिल्लीचे राजकारण आहे. महाराष्ट्रातील काम, निवडणुका सोडल्या तर दिल्लीत कोणीही विचारणार नाही, हे वास्तव आहे याची मला जाणीव आहे. असेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.

राष्ट्रवादी केवळ पक्ष नाही एक कुटुंब

या मुलाखतीदरम्यान बोलताना त्या म्हणाल्या, ‘आपली ताकद वाढवण्यासाठी सर्वच पक्ष काम करत असतात. त्यामुळे मुख्यमंत्रीपद मिळावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. यात गैर असं काहीही नाही. राष्ट्रवादी पक्ष भविष्यात वाढावा हे पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे. फक्त पवार कुटुंबीय म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नाही तर हा पक्ष एक कुटुंब आहे असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

बाबांचा सल्ला आवर्जून लक्षात ठेवते

“मला वडील शरद पवार आणि आई हे खूप कमी सल्ले देतात पण त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या आहे. ज्या आवर्जून लक्षात ठेवते. मी जेव्हा बारामती मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर बाबांनी मला चांगला सल्ला दिला होता. संसदेमध्ये पहिल्यांदा जात आहेस, ती पायरी चढण्याची संधी तुला लाभली हे तुझं भाग्य आहे. बारामतीच्या लोकांमुळे ही संधी मिळाली आहे. जेव्हा तू बारामतीकरांना विसरशील त्या दिवशी ती पायरी चढता येणार नाही, असा सल्ला बाबांनी दिला होता, तो मी कायम लक्षात ठेवते, असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

 

Leave a Comment