हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp– जगभरात प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp वर कोट्यवधी लोक दररोज संवाद साधत असतात . पण , नियम मोडणाऱ्या लाखो युजर्सची अकाऊंट्स देखील WhatsApp बॅन करत असते . भारतात फक्त फेब्रुवारी 2024 मध्येच 76 लाखांहून अधिक अकाऊंट्स बंद करण्यात आली होती. अशा परिस्थितीत तुमचं अकाऊंट कोणत्या कारणांमुळे बंद होऊ शकतं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर चला या महत्वपूर्ण बातमीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
थर्ड पार्टी अँप्स वापरणं टाळा –
WhatsApp GB, WhatsApp Plus, WhatsApp Delta यांसारख्या थर्ड पार्टी अँप्सचा वापर धोकादायक ठरू शकतो. हे अँप्स अधिकृत नसल्यामुळे, WhatsApp च्या नियमांनुसार तुमचं अकाऊंट बॅन केलं जाऊ शकतं. त्यामुळे सर्व वापरकर्त्यांची याची दक्षता घेणे महत्वाचे आहे.
खोटी ओळख वापरणे (WhatsApp)–
जर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचं प्रोफाइल फोटो, नाव किंवा ओळखपत्र वापरून मेसेज करत असाल, तर ते नियमाविरुद्ध आहे. सेलिब्रिटी, ब्रँड किंवा संस्थेची खोटी ओळख वापरणं हे देखील WhatsApp च्या गाईडलाईन्सचं उल्लंघन आहे. त्यामुळे तुमचं अकाऊंट बंद होऊ शकतं.
अकाऊंट ब्लॉक होण्याची शक्यता –
जर तुम्ही सतत अशा लोकांना मेसेज पाठवत असाल, जे तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नाहीत, तर तुमचं अकाऊंट स्पॅम म्हणून ओळखलं जाऊ शकतं. या प्रकरणात तुमचं अकाऊंट ब्लॉक होण्याची शक्यता आहे.
रिपोर्ट झाल्यास अकाऊंट बॅन –
जर काही युजर्सनी तुमचं अकाऊंट रिपोर्ट केलं, तर WhatsApp तुमच्यावर कारवाई करू शकते. तुमचं अकाऊंट रिपोर्ट करणाऱ्या व्यक्तीचा तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टशी काहीही संबंध नसला तरीही कंपनी तुमचं अकाऊंट बॅन करू शकते. त्यामुळे याची काळजी घेणे आवश्यक आहे.
आक्षेप घेणारे मेसेज –
तुम्ही कोणाला त्रास देणारे, धमकी देणारे, द्वेषपूर्ण किंवा आक्षेपार्ह मेसेज पाठवत असाल, तर तुमचं अकाऊंट बंद होऊ शकतं. या मेसेजेसवर WhatsApp कडून कडक कारवाई केली जाऊ शकते .
कम्युनिटी गाईडलाईन्स पाळणं आवश्यक –
WhatsApp वापरताना कम्युनिटी गाईडलाईन्स पाळणं आवश्यक आहे. नियम मोडल्यास, तुमचं अकाऊंट तात्काळ बंद होऊ शकतं. त्यामुळे थर्ड पार्टी अँप्स वापरणं, दुसऱ्यांना त्रास देणं आणि स्पॅमिंग करणं टाळा. हे सर्व टाळून तुम्ही तुमचे अकाऊंट ब्लॉक होण्यापासून वाचवू शकता.
हे पण वाचा : ओला, उबेरसारख्या खाजगी वाहतूक व्यवस्थांना एकाच छताखाली आणणार : परिवहन मंत्री सरनाईक