Whatsapp कडून युजर्सना नवीन भेट! आता इंटरनेटशिवाय करता येणार चॅट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – युजर्सच्या चांगल्या अनुभवासाठी Whatsapp सतत नवनवीन फीचर्स जोडत आहे. अ‍ॅप डेव्हलपर्सनी हे प्लॅटफॉर्म आणखी एक पाऊल पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. Whatsapp चे नवीनतम फीचर याचा पुरावा आहे. अ‍ॅपने जगभरातील वापरकर्त्यांसाठी प्रॉक्सी सपोर्ट सुरू केला आहे. Whatsapp कडून गुरुवारी याची माहिती देण्यात आली. प्रॉक्सी सपोर्टच्या मदतीने Whatsapp वापरकर्ते इंटरनेटशिवायही या प्लॅटफॉर्मवर कनेक्ट राहू शकतील. केवळ त्यांच्या फोनवरच नव्हे तर परिसरात इंटरनेट नसले तरीही वापरकर्ते Whatsapp सेवा वापरू शकतील. या फीचरच्या मदतीने Whatsapp वापरकर्ते जगभरातील स्वयंसेवक आणि संस्थांच्या प्रॉक्सी सर्व्हर सेटअपद्वारे कनेक्ट राहू शकतात. चला तर मग जाणून घेऊया नक्की काय आहे हे फीचर….

काय आहे Whatsapp चे नवीन फीचर्स
Whatsappने म्हटले आहे की प्रॉक्सी नेटवर्कशी कनेक्ट केलेले असतानाही, वापरकर्त्यांना गोपनीयता आणि सुरक्षिततेबद्दल काळजी करण्याची गरज नाही. त्यांना पूर्वीप्रमाणेच गोपनीयता आणि सुरक्षा मिळत राहील.त्यांचे संदेश एंड-टू-एंड एनक्रिप्टेड असतील. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यादरम्यान यूजर्सचे मेसेज कोणीही पाहू शकणार नाही. ना प्रॉक्सी नेटवर्कवर, ना मेटा किंवा स्वतः WhatsApp वर.

व्हॉट्सअ‍ॅपने एका ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘इंटरनेट बंद कधीच होऊ नये, या 2023 सालासाठी आमच्या शुभेच्छा.’ Whatsapp ने पुढे म्हंटले कि ‘गेल्या काही महिन्यांपासून इराणमध्ये ज्या प्रकारची समस्या आपण पाहत आहोत, शेवटी ते मानवाधिकार नाकारतात आणि लोकांना तातडीने मदत मिळण्यापासून रोखतात.आम्हाला आशा आहे की हा उपाय लोकांना मदत करेल, जिथे सुरक्षित आणि विश्वासार्ह-संवादाची गरज आहे.

कशा प्रकारे वापराल हे फीचर्स
नवीन पर्याय Whatsappच्या सेटिंग्ज मेनूमध्ये आढळेल. तुमच्या फोनवर WhatsApp ची नवीनतम आवृत्ती असणे आवश्यक आहे. कंपनीचे म्हणणे आहे की जर तुमच्याकडे इंटरनेटची सुविधा असेल तर तुम्ही सोशल मीडिया किंवा सर्च इंजिनवर विश्वासार्ह प्रॉक्सी स्रोत शोधू शकता.

प्रॉक्सी नेटवर्कशी कनेक्ट राहण्यासाठी, तुम्हाला WhatsApp सेटिंग्जमध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला स्टोरेज आणि डेटाचा पर्याय मिळेल. तुम्हाला प्रॉक्सी या पर्यायावर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला Use Proxy च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि प्रॉक्सी अ‍ॅड्रेस टाकून सेव्ह करावे लागेल.

अशा प्रकारे तुम्ही हे नेटवर्क नंतर वापरण्यास सक्षम असाल. कनेक्शन यशस्वी झाल्यास, तुम्हाला चेकमार्क दिसेल. जर काही कारणास्तव प्रॉक्सी कनेक्शन जोडल्यानंतरही तुम्ही संदेश पाठवू शकत नसाल, तर ते ब्लॉक केले जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला दुसरे प्रॉक्सी नेटवर्क वापरावे लागेल.

हे पण वाचा :
अंधेरीचा पहिला झटका … मशाल पेटली; सामनातून भाजपवर टीकेचा बाण
जालन्यामध्ये आयशर आणि रिक्षाचा भीषण अपघात! 5 जणांचा जागीच मृत्यू
5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये
Honda पुढील महिन्यात ACTIVA Electric करणार लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत अन् बरंच काही…
VIP मोबाईल नंबर ‘फ्री’ मध्ये मिळवण्याची संधी