Whatsapp Chat Filter Feature | WhatsApp ने लाँच केलं नवीन फिचर; चॅटिंग होणार मजेशीर अन सोप्प

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Whatsapp Chat Filter Feature व्हाट्सअप हे एक देवाणघेवाणीचे सर्वोत्तम माध्यम आहे. आज देशातील कितीतरी कोटी लोक हे व्हाट्सअपचा वापर करतात. व्हाट्सअपच्या मदतीने आपण एकमेकांशी चॅटिंग करू शकतो. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉल लावू शकतो. या व्हाट्सअपमध्ये नेहमीच नवनवीन बदल होत असतात. व्हाट्सअप अपडेट होत असते. आता देखील व्हाट्सअपने एक नवीन अपडेट केलेले आहे. अनेकवेळा आपण धावपळीमध्ये आपल्याला येणारे सगळे मेसेज पाहू शकत नाही. त्यामुळे अनेक मेसेजला रिप्लाय देण्याचे राहून जाते. परंतु आता व्हाट्सअपच्या एका नवीन फिचरमुळे तुम्हाला सगळे मेसेज पाहता देखील येणार आहेत. आणि रिप्लाय देखील करता येणार आहे.

व्हाट्सअप हे त्यांच्या यूजरसाठी नेहमीच नवनवीन फीचर्स (Whatsapp Chat Filter Feature) आणत असतात. नुकतेच कंपनीने अँड्रॉइड युजरसाठी UDI डिझाईन केलेले आहे. त्याचप्रमाणे व्हाट्सअपवर नवीन सर्च बार आणि मेटा एआय फीचर देखील आलेले आहे. परंतु हे फिचर सध्या सगळ्यांसाठी उपलब्ध नाही. अशातच व्हाट्सअपने एक नवीन फिचर आणलेले आहे. हे फीचर चॅट फिल्टर असे आहे. हे फीचर तुमच्या चॅटला अनरीड आणि ग्रुप्स या श्रेणीमध्ये विभागणार आहे

WhatsApp चॅट फिल्टर म्हणजे काय? | Whatsapp Chat Filter Feature

मिठाचे सीईओ मार्क झुबेरबर्ग यांनी हे चॅट फिल्टर लॉन्च केलेले आहे. या फीचरमुळे तुम्ही सर्व मेसेज सहज फिल्टर करू शकता. या फीचरमुळे चॅट ओपन करण्यासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. कारण आता चॅट फिल्टर करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे पर्याय उपलब्ध असणार आहे.

WhatsApp Chat Filter Feature कसे वापरायचे?

  • यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी व्हाट्सअप अपडेट करावे लागेल.
  • तुम्ही तर अँड्रॉइड युजर असाल तर तुम्हाला google play store वरूनअपडेट करावे लागेल. त्याचप्रमाणे तुम्ही IOS युजर तुम्हाला तर एप्पल ॲप स्टोअर वरून अपडेट करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला चॅट ऑप्शनवर जावे लागेल तिथे वर तुम्हाला ऑल अनरीड असे तीन ऑप्शन दिसतील.
  • म्हणजेच तुम्ही जे मेसेज वाचले नसतील ते तुम्हाला अनरिड बॉक्समध्ये पाहायला मिळतील.