Whatsapp ने बंद केले 71 लाखांहून अधिक यूजर्सचे अकॉउंट

Whatsapp Account Closed
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Whatsapp हे सर्वाधिक प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जाते. जगात Whatsapp चे वापरकर्ते अनेक आहेत. कामपणी सुद्धा आपल्या वापरकर्त्यांना चांगल्या सेवा पुरवण्यासाठी नेहमीच तत्पर असते. त्याचप्रमाणे व्हाट्सअप आपल्या यूजर्सच्या सुरक्षितेची देखील काळजी घेते. त्यामुळे 2023 मध्ये झालेल्या ऑनलाईन घोटाळ्याप्रकरणी व्हाट्सअपने तब्बल 71 लाखाहून अधिक अकॉउंट बंद केले आहेत.

2021 च्या IT नियमाअंतर्गत केली कारवाई

Whatsapp च्या 2021 च्या आयटी नियमानुसार सर्व सोशल मीडिया कंपन्यांना महिन्याला यूजर सेफ्टी रिपोर्ट द्यावा लागत असून त्याबाबत आलेल्या तक्रारीही सांगाव्या लागतात. त्यानुसार ऑनलाईन घोटाळ्याच्या तक्रारी आल्यामुळे एका महिन्यात व्हाट्सअपने भारतातील तब्बल 71 लाख 96 हजार अकाऊंट्सवर बंदी घातली असून त्यातील 19 लाख 54 हजार खाते कंपनीच्या देखरेखेखाली ठेवण्यात आले आहेत.

वापरकर्त्यांच्या सुरक्षितेसाठी व्हाट्सअपने आणले नवीन फिचर

एका महिन्यात व्हाट्सअपकडे अनेक तक्रारी आल्यामुळे हे अकाउंट बंद करण्यात आले आहेत. ही वेळ तुमच्यावरही येऊ शकते. जर तुम्ही व्हाट्सअपच्या नवीन नियमानुसार जर वागला नाहीत तर तुमचेही खाते बंद होऊ शकते. तसेच नोव्हेंबर महिन्यात तब्ब्ल 8841 एवढ्या तक्रारी आल्या होत्या. त्यामध्ये कंपनीने सहा जणांवर कारवाई केली आहे. होणाऱ्या फ्रॉडमुळे व्हाट्सअपने यूजर्ससाठी सुरक्षिता वाढणारे फिचर आणले आहेत. त्यामध्ये चॅट लॉक, ईमेल ऍड्रेस लिंक पासकी यासारखे अनेक नवीन फिचर आणले आहेत. हे फिचर असताना व्हाट्सअप आणखी एक नवीन फिचर आणणार आहे. या नवीन फिचर मध्ये तुम्हाला स्टेटसला रिप्लाय देण्यासाठी तुम्हाला रिप्लाय यावर क्लिक करायची गरज भासणार नाही. तसेच एंड-टू-एंड एन्क्रिप्शन, वाय-फाय कनेक्शन यामध्ये डेटा कनेक्शनशिवाय व्हाट्सअप वापरता येऊ शकणार आहे.