हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp युझर्ससाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता मेटाच्या मालकी असलेल्या या मेसेजिंग प्लॅटफॉर्मकडून iOS वर लवकरच एक स्टिकर मेकर टूल रिलीज केले जाणार आहे. याद्वारे युझर्सना आता आपल्या इमेजेसना स्टिकर्समध्ये बदलता येईल. Wabateinfo च्या एका रिपोर्ट्सनुसार, या नवीन फीचर्सद्वारे आता स्टिकर्स तयार करण्यासाठी युझर्सना कोणत्याही थर्ड पार्टी ऍप्सची गरज भासणार नाही.
इमेजमधून सब्जेक्ट एक्सट्रेक्ट केल्यानंतर युझर्सना इमेजमधून कस्टम स्टिकर तयार करण्यासाठी चॅटमध्ये पेस्ट करावे लागेल. जर हे फीचर्स उपलब्ध असेल तर प्लॅटफॉर्म लगेचच इमेजला एका स्टिकरमध्ये बदलेल. जे युझर्सच्या स्टिकर्स कलेक्शनमध्ये जोडले जाईल. गेल्या काही दिवसांमध्ये फक्त काही युझर्ससाठीच हे टूल उपलब्ध झाले होते. मात्र, ते आता iOS 16 वर प्रत्येकासाठी रिलीझ केले जात आहे.
आता यापुढे WhatsApp युझर्सना आपले स्वतःचे स्टिकर्स तयार करण्यासाठी आणि वापरण्यासाठी इतर कोणतेही ऍप किंवा टूल्स वापरण्याची गरज भासणार नाही. “यामुळे वेळेची बचतही होईल. त्याचबरोबर कस्टम स्टिकर्स तयार करण्याची आणि वापरण्याची प्रक्रिया आणखी वेगवान होईल,” असेही या रिपोर्ट म्हटले गेले आहे.
दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीलाच या मीसेजिंग प्लॅटफॉर्मने पर्सनल अवतार तयार करण्याच्या क्षमतेची घोषणा केल्यानंतर, Android आणि iOS साठी आपले अवतार स्टिकर पॅकमध्ये काही नवीन स्टिकर्स जोडले होते. WhatsApp
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.whatsapp.com/
हे पण वाचा :
LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा 50 लाख रुपये
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत संमिश्र कल, तपासा आजचे नवे भाव
आपल्या Pan Card चा गैरवापर तर झाला नाही ना ??? घरबसल्या अशा प्रकारे तपासा
बाजारात धुमाकूळ घालायला येतोय OnePlus चा ‘हा’ स्वस्त फोन, असे असतील फीचर्स
Digital Gold : आता फक्त 1 रुपयात खरेदी करता येईल सोने, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया