WhatsApp मध्ये आलं नवं फीचर्स; Video Call वर मिळणार भरपूर मजा

whatsapp video call feature
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | WhatsApp चा वापर करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. WhatsApp वर अनेक कामे होत असल्याने ग्राहकांची सर्वात जास्त पसंती ही WhatsApp लाच असते. दिवसेंदिवस व्हाट्सएप्प वापरणाऱ्यांची संख्या वाढतच असून आपल्या यूजर्ससाठी कोणते फिचर चांगले आणि फायदेशीर असेल याची काळजी ते नेहमीच घेतली जाते. आपल्या यूजर्स साठी कंपनी WhatsApp मध्ये वेळोवेळी नवनवीन फीचर्स आणत असते. आताही WhatsApp ने एक नवं फीचर्स आणलं असून या फीचर्समुळे यूजर्सना Video Call वेळी मजेशीर अनुभव येणार आहे. हे फिचर नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात….

काय आहे हे फिचर?

व्हाट्सअपच्या या नवीन फिचर मध्ये तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत किंवा कोणासोबत सुद्धा व्हिडीओ कॉल दरम्यान त्यामध्ये म्युझिक ऑडिओ शेअर करता येऊ शकणार आहे. त्यामुळे यूजर्सला या नवीन फिचरचा एक वेगळाच अनुभव अनुभवायला मिळणार आहे.डब्ल्यूएबीटाइंफोने (WABetaInfo) या वेब साईटने दिलेल्या अहवालात हे नवीन फिचर iOS आणि Android दोन्ही ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे असे सांगितलं आहे.

तर IANS ने दिलेल्या माहितीनुसार, म्युझिक ऑडिओ शेअर करण्यासह ऐकण्याची सुविधा देण्यात येणार आहे. त्यामुळे मल्टिमीडियाचा वापर वाढणार आहे. असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. या नवीन फिचरमुळे यूजर्सचे कोम्मुनिकेशन हे समृद्ध होईल असेही या अहवालात सांगितले आहे. यासोबतच व्हाट्सअपने अजून एक नवीन फिचर आनत आहे. त्यामध्ये यूजर्सला ईमोजी रिप्लेसमेंटचा पर्याय मिळणार आहे. तसेच यामध्ये मायक्रोसॉफ्ट स्टोअर ते विंडोज 2.2350.3.0 अपडेटसाठी नवीनतम व्हॉट्सॲप बीटा इन्स्टॉल करता येईल. त्याचप्रमाणे युझर्सला टेक्स टू इमोजी रिप्लेसमेंट पर्याय डिसबेल करण्याची परवानगी देते. या फिचरला यूजर्स एन्जॉय करतील अशी अशा आहे.