Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ एक्सप्रेसवे घडवणार नवी क्रांती; नागपूर- गोवा प्रवास अवघ्या 7 तासांत होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पूर्व, पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातील 3 शक्तीपीठे, 2 ज्योतिर्लिंगे आणि तीर्थक्षेत्रे यांना जोडण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ एक्सप्रेसवे (Shaktipeeth Expressway) तयार करण्यात येणार आहे. या महामार्गामुळे नागपूर ते गोवा प्रवास अवघ्या ७ तासांत होणार आहे. तसेच पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्राच्या पर्यटनाला सुद्धा मोठी चालना मिळणार आहे. सध्या नागपूर हुन गोवाला जाण्यासाठी तब्बल २१ तास लागतात परंतु या नव्या एक्सप्रेस वे मुळे हे अंतर तुम्ही अवघ्या ७ तासांत पूर्ण करू शकणार आहात. या द्रुतगती महामार्गाचे संरेखन हे अंतिम टप्प्यात आले आहे.

86,000 कोटींहून अधिक खर्च – Shaktipeeth Expressway

शक्तिपीठ एक्सप्रेसवे बनवण्यासाठी तब्बल 86,000 कोटींहून अधिक खर्च करण्यात येणार आहे. या मार्गद्वारे पवनार (वर्धा जवळ) ते पत्रादेवी (पर्नेम तालुका) ला जोडणारा सहा-लेन प्रवेश-नियंत्रित महामार्ग म्हणून 760 किमीचा विस्तार करेल. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा येथील तीर्थक्षेत्रे जोडण्याच्या दृष्टीने या महामार्गाचे डिझाईन करण्यात आले आहे.

पर्यावरणीय शाश्वतता म्हणून मार्गावर लावण्यात येणार झाडे

हा मार्ग पर्यावरणाला पूरक ठरवा यासाठी तसेच पर्यावरणीय शाश्वतता म्हणून सरकारकडून या मार्गावर हजारो झाडे – झुडपे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार केला आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट म्हणजे पर्यटनास चालना देणे आहे. या एक्स्प्रेसवेच्या विकासातील DPR तयार करण्यासाठी तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत.

समृद्धी महामार्गाची वाढणार कनेक्टिव्हिटी

2028 ते 2029 या कालावधीत एक्सप्रेसवे तयार होऊन या महामार्गामुळे पर्यटणासाठी तसेच या प्रदेशासाठी वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये भर होईल अशी अशा आहे. नागपूर – गोवा हा शक्तीपीठ एक्सप्रेस वे (Shaktipeeth Expressway) वर्धा येथील 701 किमीच्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाशी जोडला जाईल अशी अपेक्षा आहे.