WhatsApp Status थेट FB Stories वर शेअर करता येणार; कसे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रोजच्या वापरातील प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp नेहमीच आपल्या यूजर्ससाठी नवनवीन अपडेट्स आणत असते. व्हॉट्सअॅप स्टेटस फेसबुक शेअर करण्याचा पर्याय यापूर्वी सुद्धा होता परंतु आता यामध्ये अजून सुधारणा करत आता एक नवीन अपडेट आणले गेले आहे. या अपडेट अंतर्गत यूजर्सना व्हॉट्सअॅप स्टेटस थेट फेसबुक स्टोरीवर शेअर करण्याचा पर्याय मिळत आहे.

WABetaInfo नुसार, यापूर्वी सुद्धा व्हाट्सअँप आपले स्टेटस फेसबुक स्टोरीजमध्ये शेअर करू शकत होते, परंतु प्रत्येक वेळी त्यांनी काहीतरी नवीन पोस्ट केल्यावर, त्यांना मॅन्युअली पद्धतीने अपडेट शेअर करावं लागत होते. परंतु आता नव्या अपडेटनांतर हेच स्टेट्स ऑटोमॅटिक पद्धतीने तुम्ही फेसबुकवर शेअर करू शकता.

privacy setting मध्ये मिळेल option

व्हॉट्सअॅपवर स्टेटस प्रायव्हसी सेटिंगमध्ये वापरकर्त्यांना नवीन पर्याय मिळेल. रिपोर्टनुसार, युजर्स शेअर माय स्टेटस अपडेट्स अक्रॉस माय अकाऊंट्स ऑप्शनच्या (Share my status updates across my accounts) माध्यमातून फेसबुक अकाउंट अॅड करू शकतात. अशा परिस्थितीत, व्हॉट्सअॅप मधून बाहेर न पडत तुम्ही तेथूनच तुमच्या फेसबुक स्टोरीजमध्ये काही स्टेटस अपडेट शेअर करू शकाल. या फीचर्स मुळे तुमची मेहनत आणि वेळ वाचण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, व्हॉट्सअॅप “ऑडिओ चॅट्स” नावाच्या एका नवीन फीचर्स वर सुद्धा काम करत आहे. यानुसार, व्हाट्सअँप चॅट हेडरमध्ये एक नवीन वेव्हफॉर्म आयकॉन जोडला जाईल, ज्यामुळे यूजर्स ऑडिओ चॅट सुरू करू शकतील येईल, तसेच त्यांना चालू असलेला कॉल कट करण्यासाठी करण्यासाठी लाल बटण दिले जाईल.