Whatsapp New Update | व्हाट्सअपने लॉन्च केले नवीन फिचर, अशा पद्धतीने करता येणार पर्सनल मेसेज पिन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Whatsapp New Update | सोशल मीडिया आल्यापासून दूरच्या दोन व्यक्तींना संवाद साधणं खूप सोपे झालेले आहे. अगदी जग आपल्या समोर आल्यासारखे आपल्याला वाटते. या सोशल मीडियामध्ये व्हाट्सअपचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना अगदी सहज पद्धतीने आपल्याला या व्हाट्सअपचा वापर करता येतो. हे एक इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे. ज्याच्या माध्यमातून आपण समोरच्या व्यक्तीशी चॅटिंग करू शकतो, व्हिडिओ कॉल करू शकतो. त्याचप्रमाणे व्हॉइस कॉल देखील करू शकतो. यामध्ये अनेक नवनवीन फीचर्स आत्तापर्यंत आलेले आहेत. ज्याचा फायदा व्हाट्सअपच्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात झालेला आहे.

आता देखील मिठाच्या इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हाट्सअपने (Whatsapp New Update) एक नवीन फीचर रिलीज केलेले आहे. ज्याचा फायदा व्हाट्सअपच्या सगळ्याच ग्राहकांना होणार आहे. व्हाट्सअपने अपडेट केलेल्या नवीन फीचर्सनुसार आता तुम्हाला whatsapp वर कोणताही मेसेज पिन करता येऊ शकतो. म्हणजे चॅट बॉक्समध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी लक्षात ठेवू शकता सगळ्यात आधी हे पिन मेसेज फीचर फक्त ग्रुपसाठी उपलब्ध होता. परंतु आता पर्सनल मेसेजेससाठी देखील हे फीचर अपडेट झालेला आहे.

हे नवीन फीचर टेक्स्ट व्हिडिओ त्याचप्रमाणे फोटो यासारख्या सगळ्या मेसेजेसला सपोर्ट करेल. त्यामुळे तुम्हाला कोणताही गरजेचा मेसेज असेल तर तुम्हाला लक्षात राहत नसेल, तर तुम्ही पिन करून ठेवू शकता आणि त्यामुळे तुम्हाला खूप मदत होईल. या अपडेटची माहिती मार्क झुकरबर्ग यांनी दिलेली आहे. हा पिन मेसेज पर्सनल चार्टमध्ये 14 तास, 7 दिवस किंवा 30 दिवसांसाठी पिन केला जाऊ शकतो.

मेसेज पिन कसा करायचा? | Whatsapp New Update

पर्सनल चॅटमध्ये किंवा ग्रुपच्या आतमध्ये जो मेसेज तुम्हाला पिन करायचा आहे. तो मेसेज सिलेक्ट करायचा. त्यावर थोडावेळ प्रेस करायचे. आता अनेक ऑप्शन दिसतील त्या त्यात तुम्ही मोअर ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. आता त्यात दुसरा मेन ओपन होईल. त्यात सर्वात वर पिन असं लिहिलेलं असेल. त्यावर क्लिक केलं की तुमचा मेसेज पिन होऊन चॅटिंगच्या सगळ्यात वर जाईल.

तुम्हाला जर ग्रुपमध्ये हा मेसेज पिन करायचा असेल तर त्यासाठी काही अटी दिलेल्या आहेत. म्हणजेच ग्रुपमध्ये असणारा एडमिन हा ठरवतो की, ग्रुपच्या चॅमध्ये कोणता मेंबर हा मेसेज पिन करू शकतो. त्याचप्रमाणे ॲडमिन पिन चॅट विषयी ग्रुपमध्ये सेटिंग देखील चेंज करू शकतो. परंतु तुम्ही वैयक्तिक पद्धतीने देखील हा मेसेज पिन करू शकता.