व्हॉट्सॲपचे नवीन फीचर ! व्हिडिओ पाठवताना आता ‘हा’ नवीन ऑप्शन दिसून येईल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | Whats App हे अल्पावधीमध्ये लोकप्रिय झालेले एक मेसेजिंग ॲप आहे. आपल्या ग्राहकांना नवनवीन फीचर देण्यासाठी व्हॉट्सॲप प्रसिद्ध आहे. गेल्या काही दिवसात सेक्युरीटी अपडेटमुळे व्हॉट्सॲप चर्चेत आले होते. त्यानंतर व्हॉट्सॲपने सिक्युरिटी अपडेट मागे घेतले. आता लोकप्रियता टिकवण्यासाठी व्हॉट्सॲपने नवनवीन फीचर ग्राहकांना देण्यास सुरवात केली आहे. या नवीन फिचरमध्ये तुम्ही कोणाला व्हिडिओ पाठवला तर पाठवण्याच्या आधी तुम्ही तो व्हिडिओ म्युट करू शकता.

माध्यमाच्या एका अहवालानुसार व्हॉट्सॲपचे हे फीचर अँड्रॉइड बीटा वर्जन 2.21.3.13 वर उपलब्ध आहे. या अँड्रॉइड वर्जनवर हे फीचर पाहता येणार आहे. सद्ध्या याचे स्टेबल वर्जन बाजारात आले आहे. लवकरच मूळ वर्जन येणार आहे. व्हिडिओ पाठवताना व्हिडिओची लांबी आणि साइजसुद्धा दिली आहे. व्हिडिओ पाठवताना आधी सारखीच प्रोसेसे असेल. फक्त व्हिडिओ पाठवताना वरच्या बाजूला डावीकडे मुट व्हिडिओ असा ऑप्शन आहे. त्यावर क्लिक करावे लागणार आहे.

या फीचरवर कंपनी खूप दिवसापासून काम करत आहे. आयफोनच्या बीटा वर्जनवर याचे टेस्टिंग झाले होते. आयफोनवर यशस्वी झाल्यानंतर आता अँड्रॉइडच्या वर्जनवरही यशस्वी टेस्टिंग केली गेली आहे. आता सगळेच या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित फिचरचा वापर करू शकणार आहेत. याच आठवड्यामध्ये सर्वांपर्यंत हे फीचर पोहचेल अशी आशा आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment