हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बदलत्या हवामानासोबत आपल्याला अनेक शारीरिक बदल देखील होत असतात. पावसाळा आला की, पावसासोबत अनेक आजार देखील सोबत घेऊन येतो. पावसामध्ये व्हायरल इन्फेक्शनची खूप जास्त भीती असते. त्यामुळे अनेक लोक तसेच लहान मुलं देखील पावसाळ्यात आजारी पडतात. तसेच त्यांचे वय झालेले आहे त्या लोकांना सहसा पावसामध्ये सांधेदुखीची समस्या उद्भवतात. परंतु अनेक लोक पावसाळ्यात होणाऱ्या सांधेदुखीकडे दुर्लक्ष करतात परंतु असे करू नये. हवामान बदलले की, त्यातील आद्रता अनेक प्रकारचे संक्रमण या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या शरीरावर वेगवेगळे परिणाम होत असतात. आणि हे बदलते वातावरण आपले शरीर सहसा स्वीकारत नाही. त्यामुळे आपल्याला सांधेदुखीची समस्या उद्भवते. आता पावसाळ्यात सांधेदुखीची समस्या नक्की कशाप्रकारे उद्भवते हे आज आपण जाणून घेणार आहोत.
पावसाळ्यात सांधेदुखी काय होते
ओलसरपणा
पावसाळ्यातील हवामान हे दमट असते. या दमट हवामानामुळे आपल्या सांध्यामुळे एका प्रकारचे द्रव्य जमा होते आणि सांध्यांना सूज येऊ लागते. त्यामुळे संधिवात असलेल्या व्यक्तींना जास्त त्रास होतो.
तापमानात बदल
आपल्याकडे उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो. उन्हाळ्यामध्ये उष्णतेची लाट असते आणि पावसाळा आला की, वातावरणात अचानक बदल होतो. अनेकांना हा बदल सहन होत नाही. त्यामुळे त्यांची सांधेदुखी चालू होते. यामुळे सांध्यांना कडकपणा, सूज येते आणि वेदना देखील जाणवू लागतात.
शारीरिक हालचाली कमी
पावसाळ्यामध्ये सहसा लोकांना कुठे फिरायला किंवा जॉगिंगसाठी बाहेर जाता येत नाही. त्यामुळे त्यांच्या शारीरिक हालचाली कमी असतात. या सगळ्यांमुळे त्यांचे स्नायू कमकुवत होतात. आणि सांध्यातील वेदना वाढतात. आणि सांध्यांना कडकपणा देखील प्राप्त होतो.
सांधेदुखी पासून आराम कसा मिळवायचा
पावसाळ्यामध्ये सहसा आपल्याला बाहेर पडता येत नाही. अशावेळी तुम्ही घरातच स्ट्रेचिंग करू शकता, चालू शकता. किंवा जॉगिंग करू शकता. यामुळे तुमचे वजन देखील नियंत्रणात राहील जास्त वजनामुळे तुमच्या सांध्यांवर दबाव येणार नाही आणि जास्त वेदनात देखील होणार नाही. त्याचप्रमाणे आपण जर जास्त पाणी पिलो तर सांध्यातील लवचिकता टिकून राहते. त्यामुळे संध्याकाळी होत नाही. आणि त्यांना हलके होणे सोपे जाते म्हणूनच जास्तीत जास्त पाणी प्या तुमच्या सांध्यातील सूज कमी करण्यासाठी सोडियम कमी प्रमाणात खा. सांधे दुखीसाठी तुम्ही चांगले पदार्थ खाणे गरजेचे असते. ज्या पदार्थांमुळे जळजळ कमी होते ते पदार्थ जसे की फ्लेक्स सीड, ब्रोकोली यांसारख्या गोष्टींचे सेवन करा. तसेच हळदीमुळे देखील सांधेदुखी कमी होते