हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्य सरकारने नवीन लॉकडाऊनचा निर्णय घेत त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी हि आज रात्री आठ वाजल्यापासून करणार असल्याचं सांगितलं आहे. राज्य सरकारच्या या नवीन लॉकडाऊनमधील नियमांमध्ये लग्नाबाबत मात्र केवळ दोन तासांची वेळेची मर्यादा ठेवली आहे, या मुद्यावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारकडे विंनतीवजा टोले लगावले आहेत. नवीन लॉकडाऊन व विवाह समारंभाबाबत नियम लावताना जेवढं डोक आहे तेवढं तरी किमान वापरा, अशी विंनती भातखळकर यांनी केली आहे.
राज्य सरकारने नवीन लॉकडाऊनमधील जाहीर केलेल्या नियमांबाबत आज भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे ठाकरे सरकारने नवीन लॉकडाऊनमधील नियमांबाबत मत व्यक्त केले. भातखळकर म्हणाले,काल राज्य सरकारने लग्न व नवीन लॉकडाऊन संदर्भात लावलेले तथा कथित निर्बंध म्हणजे राज्यात सावरलेला पोरखेळ आहे. एकदा २५ लग्नासाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिल्यावर २ तासाची जाचक अट कशासाठी? आणि दंड ५० हजार? हिंदू धर्मातल्या विधींप्रमाणे किमान ४-५ तासाची परवानगी द्यावी अन्यथा “जनतेचे हाल आणि (नवीन) सचिन वाजे लालेलाल” अशी बेदीली समाजात माजेल. नियम करताना जेवढं डोक आहे तेवढं तरी किमान वापरा. अशी माझी राज्य सरकारला विनंती आहे, अशी माहिती भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे दिली आहे.
एकदा २५ लग्नासाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिल्यावर २ तासाची जाचक अट कशासाठी? आणि दंड ५० हजार? हिंदू धर्मातल्या विधींप्रमाणे किमान ४-५ तासाची परवानगी द्यावी अन्यथा "जनतेचे हाल आणि (नवीन) सचिन वाजे लालेलाल" अशी बेदीली समाजात माजेल. नियम करताना जेवढं डोक आहे तेवढं तरी किमान वापरा. pic.twitter.com/E3C8qIzJ6R
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 22, 2021
तसेच रेमडीसीवर इंजेक्शनबाबतही भातखळर यांनी मत व्यक्त केलं, ते म्हणाले, केंद्र सरकारने राज्यांना रेमडेसिव्हीरचं वाटप करताना राज्यातील सक्रीय रुग्णसंख्येचा विचार केला. त्यानुसार महाराष्ट्राला सर्वाधिक 2 लाख 69 हजार इंजेक्शन्स मिळाले आहेत. खरं तर रेमडेसिव्हीर प्राप्त करणं हे राज्याचं काम. पण तरीदेखील केंद्राने महाराष्ट्राला सर्वाधिक इंजेक्शन्स दिले. अशावेळी केंद्रावर टीका करणे म्हणजे केवळ कृतघ्नपणा आणि राजकारण असल्याची टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केलीय. त्याचबरोबर ‘ठाकरे सरकारचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात महाराष्ट्राला 50 हजार रेमडीसीवीर हवे आहेत, आव्हाड म्हणतात 70 हजार आणि बोरूबहाद्दर संजय राऊत म्हणतात 80 हजार. मनाला येईल ते प्रत्येक जण बोलतोय. अहो, बोलण्यापूर्वी एकदा ठरवा तर की कोणता आकडा सांगायचाय ते’, असा टोलाही भातखळर यांनी लगावलाय.
ठाकरे सरकारचे आरोग्यमंत्री @rajeshtope11 म्हणतात महाराष्ट्राला 50 हजार रेमदेसीवीर हवे आहेत, आव्हाड म्हणतात 70 हजार आणि बोरूबहाद्दर संजय राऊत म्हणतात 80 हजार. मनाला येईल ते प्रत्येक जण बोलतोय. अहो, बोलण्यापूर्वी एकदा ठरवा तर की कोणता आकडा सांगायचाय ते. pic.twitter.com/VZlxNWOZmG
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 22, 2021