कराड | सांगली येथे राष्ट्रवादीचे गाढव बरळल होत, ते गाढव म्हणजे आ. अमोल मिटकरी हे होय. त्यामध्ये आणखी दोन गाढव सामील झाली होती. एक जयंत पाटील आणि धनंजय मुंडे ही गाढव दात काढत होती. राष्ट्रवादी पक्ष जोपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन चालू राहिल. मंत्राची काही माहिती नसताना ही लोक दात काढत होती. तेव्हा सर्व समाजाकडून मिटकरीचा जाहीर निषेध करत आहोत, अशा तिखट शब्दात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर जोरदार निषेध केला.
कराड येथील शहर पोलिसांना समस्त ब्राम्हण समाज सामाजिक संस्था कराड यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी विक्रम पावसकर बोलत होते. यावेळी निवेदनावर अध्यक्ष जयंत बेडेकर, सचिव अोंकार आपटे यांच्या स्वाक्षरी आहेत. तर बहुभाषिक ब्राम्हण संघ- विद्यानगर, आगाशिवनगर, चित्पावन ब्राम्हण संघ- कराड, वेदशास्त्र विद्या संवर्धन मंडळ- कराड, ऋग्वेद स्वाहाकार समिती- कराड, ब्राम्हण बहुद्देशीय चॅरीटेबल फाैंडेशन- कराड यांच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला.
महाराष्ट्र हे साधूसंताची भूमी आहे. संस्कृती मानणारे राज्य आहे. परंतु जाती- जातीत तेढ निर्माण करून त्यातून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न काही मंडळी करत असतात. तेव्हा कराड येथील पावसकर गल्ली येथे शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता आ. अमोल मिटकरींना जोडे मारो आंदोलन करण्यात येणार असल्याचे विक्रम पावसकर यांनी सांगितले.
निवेदनात सांगील येथील भाषणाची व्हिडीअो क्लिप घेवून पोलिसांनी आ. अमोल मिटकरी व सभा आयोजक आणि सभेत हजर राहून कोणतीही कारवाई न करता समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यास दाद देणाऱ्या शासनाच्या प्रतिनिधी जयंत पाटील व धनंजय मुंडे यांचे विरूध्द भारतीय दंड संहितेनुसार उचित कारवाई त्वरीत करण्याची मागणी केली आहे.