केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे जेव्हा ‘महाभारतातील चौसर’ च्या खेळात रंगतात… पहा व्हिडिओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल पोळासणानिमित्त सासुरवाडीत घालवला. यावेळी पोळ्यासाठी सजवलेल्या बैलांना पेठविण्यासह गावातील मंदीरासमोर जेष्ठ नागरीक खेळत असलेला महाभारतातील प्रसिद्ध सारीपाट या खेळाचा आनंद घेतला. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची सासुरवाडी सिल्लोड तालुक्यातील निल्लोड असल्याने ते काही खासगी कामानिमित्त येथे आले होते. पोळा सण असल्याने रस्त्याने जातांना एका ठिकाणी शेतकरी बैलांना सजवत असल्याचे पाहील्यानंतर रावसाहेब दानवे यांच्यातील शेतकरी जागा होऊन त्यांनी शेतात जाऊन बैलांना हाती धरुन पाहणी केली.

यावेळी गावातून जात असताना मारोती मंदीरासमोर काही जेष्ठ वृद्ध ग्रामस्थ रिंगण करुन काहीतरी खेळ खेळत असल्याचे त्यांच्या नजरेस पडले यावेळी त्यांनी उत्सुकता म्हणून येथे गेले असता खेळणाऱ्या ग्रामस्थांकडून या खेळाबाबत माहीती जाणून घेतली. हा खेळ हा पुरातन काळातील सारीपाट म्हणून ओळखल्या जातो व याला चौसर, द्युत आदी नावाने सुद्धा ओळखल्या जातो व खेळण्याची पद्धतीबद्दल माहीती खेळाडूंनी दिली. बहुतेक ग्रामस्थ वृद्ध असल्याने दिवसभराचा वेळ जावा म्हणून व पुरातन काळातील या खेळाचे जतन व्हावे यासाठी हा खेळ खेळत असून, कोणत्याही पैशावर कींवा वस्तुवर खेळत नाही. चहा सुद्धा स्वत:च्या खर्चाने पीत असल्याचे या ग्रामस्थांनी सांगितले. आपण गावचे जावई एव्हढ्या मोठ्या पदावर गेले आणि आमच्यासारख्या सर्वसामान्यांसोबत बसल्याने त्यांनी ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करुन आलेच आहात तर एक डाव खेळून जा असा आग्रह धरला.

यावेळी रावसाहेब दानवेंसह सर्वांनी काहीवेळ सारीपाटाचा खेळ खेळला. यावेळी भाजप प्रदेश कार्यकारीणी सदस्य सुरेश बनकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे व सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाण्याचे अध्यक्ष इद्रिस मुलतानी यांची उपस्थिती होती. पट, सोंगट्या व कवड्या (फासे) या साहीत्याने खेळला जाणारा हा खेळ बैठ्या पद्धतीने खेळला जातो. प्राचीन काळात भारतात लोकप्रिय असलेला हा खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर असून, ग्रामीण भागातील काही गावातच काही वृद्ध ग्रामस्थ सारीपाट हा खेळ खेळत असल्याचे दिसून येते.

Leave a Comment