नवी दिल्ली प्रतिनिधी । “कश्मीर कधी पाकिस्तानचे होते..? आज जो पाकिस्तान बनला आहे , तो तर पहिले भारताचाच हिस्सा होता. आता ते राष्ट्र बनले आहे, म्हणून आम्ही त्यांच्या राष्ट्रांचा आदर करतो. मात्र याचा अर्थ असा नाही की त्यांनी कश्मीर बाबत काहीही विधान करावे” अशा शब्दात केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी पाकिस्तानला सुनावले.
आज लद्दाख़ येथे संरक्षण विभागाच्या ‘डीआरडीओ’च्या ‘किसान जवान विज्ञान मेळा’ आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कश्मीर आमचे होते यावर देशात कधीही कोणतीच शंका नव्हती. कारण हा आमचाच प्रदेश होता. मात्र गिलगिट-बाल्टिस्तान सह त्यांनी पाकव्याप्त कश्मीर वर गैर कानूनी कब्ज़ा केला आहे. तसेच तेथील नागरिकांच्या मानवी अधिकारांचे शोषण केले जात आहे यावर पाकिस्ताने लक्ष द्यावे, अशी समज त्यांनी यावेळी पाकिस्तानला दिली.
मैं पाकिस्तान से पूछना चाहता हूं कि कश्मीर पाकिस्तान के पास था कब? और पाकिस्तान भी तो इसी भारत से निकल कर बना है।
हम पाकिस्तान के वजूद का सम्मान करते हैं इसका अर्थ यह नहीं है कि वह कश्मीर को लेकर कोई लगातार बयानबाजी करता रहेगा।
— Rajnath Singh (@rajnathsingh) August 29, 2019
कश्मीर हमारा रहा है इस बात पर इस देश में कभी शक शुबहा नही रहा है। सच्चाई यह है कि POK और गिलगिट-बाल्टिस्तान पर पाकिस्तान अवैध क़ब्ज़ा बनाया हुआ है।पाकिस्तान को PoK के नागरिकों के मानवाधिकारों के हनन पर ध्यान देना चाहिए।
— Rajnath Singh (@rajnathsingh) August 29, 2019