शेअर बाजार 1 लाखांची लेव्हल कधी गाठणार?? एक्सपर्ट म्हणतात की….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । Jefferies चे जागतिक इक्विटी स्ट्रॅटेजिस्ट क्रिस्टोफर वुड यांनी म्हटले आहे की,” भारतीय शेअर बाजार 1,00,000 चा टप्पा गाठण्याच्या स्थितीत पोहोचला आहे. त्यांना विश्वास आहे की EPS मध्ये 15 टक्के वाढ होणे शक्य आहे आणि त्यांचे मूल्यांकन हे गेल्या पाच वर्षांच्या दृष्टिकोनावर आधारित आहे. भारतीय बाजारासाठी महागाई हा चिंतेचा विषय नसल्याचे वुड यांचे म्हणणे आहे. US Fed पॉलिसी आणि तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारतीय शेअर बाजार धोक्यात आला आहे.

क्रिस्टोफर वुड म्हणाले की,”भारतीय शेअर बाजाराची वाढ ही गुंतवणूकदारांसाठी नेहमीच चांगली राहिली आहे. ग्रोथ ओरिएंटेड इक्विटीसाठी भारत हा प्रमुख केंद्रबिंदू असायला हवा.” वुड पुढे म्हणाले की,” ते आपल्या दीर्घकालीन भारत पोर्टफोलिओमध्ये देशांतर्गत मागणी कायम ठेवतील.”

यापूर्वी, इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत वुड यांनी म्हटले होते की,”US Fed मुळे भारतीय शेअर बाजारात थोडीशी सुधारणा झाल्यास त्यांना अजिबात आश्चर्य वाटणार नाही.” वूड म्हणाले की,” इथे हे समजून घेणे आवश्यक आहे की, वाढती महागाई ही भारतातील समस्या नसून ती अमेरिका आणि G7 जगासाठी चिंतेची बाब आहे.”

भारतीय बाजारपेठ मजबूत आहे
वुड म्हणाले की,”जर Fed पॉलिसीमुळे जागतिक बाजारात सुधारणा होत असेल, तर भारतीय शेअर्स खरेदी करण्याची संधी म्हणून ती घेतली पाहिजे.” वुड पुढे म्हणाले की,” रुपया अजूनही वरच आहे. यावर्षी भारतीय बाजारासाठी दोन धोके आहेत. एक म्हणजे US Fed रिझर्व्हची पॉलिसी आणि दुसरे म्हणजे तेलाच्या वाढत्या किमती. भारतातील हाऊसिंग मार्केट रिकव्हरीच्या टप्प्यात आहे. भारताच्या देशांतर्गत अर्थव्यवस्थेसाठी हे सकारात्मक लक्षण आहे. भारतात देशांतर्गत मागणी वाढत आहे. याचा अर्थ उच्च व्याजदर असूनही मार्केट चांगली कामगिरी करेल.”

केवळ ख्रिस्तोफर वुडच नव्हे, तर अन्य काही दिग्गज मार्केट एक्सपर्टर्सनीही भारतीय शेअर बाजाराच्या भविष्यात नवा आदर्श ठेवण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे अध्यक्ष रामदेव अग्रवाल यांनीही पुढील दहा वर्षांत सेन्सेक्स 50,000 वरून 2,00,000 पर्यंत वाढेल असे सांगितले होते. येत्या दहा वर्षांत बाजारपेठ चार पटीने वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. दहा वर्षांत सेन्सेक्सने चार वेळा ही कामगिरी केली आहे.

Leave a Comment