लाईक राधे माँ..?; कुठून आलं हे झुरळ.. विक्रांत मेस्सीच्या कमेंटवर कंगनाने मागितली चप्पल

0
42
Kangna_Yami_Vikrant
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम आणि उरी चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धर यांचा नुकताच विवाहसोहळा पार पडला. यानंतर तिने सोशल मिडियावर शेअर केलेले त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामी आणि आदित्यचे लग्न हिमाचल प्रदेशमध्ये झाले. यामी पहाडी वधू झाल्याचे पाहून कंगना रनौतचा आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र आनंदासोबत थोडा तिखटाचा माराही तिने केला आहे. अभिनेता आयुषमान खुराना आणि विक्रांत मेस्सी यांनी यामीच्या फोटोवर केलेली कमेंट पाहून कंगना अशी भडकली तिने थेट चप्पलच मागितली. आता का ते पुढे वाचा..

https://www.instagram.com/p/CPxGNPKF_Bp/?utm_source=ig_web_copy_link

यामीने शेअर केलेल्या लग्नाच्या विविध इव्हेन्टच्या फोटोमधील एका फोटोत तिने लाल रंगाची साडी परिधान केल्याचे दिसत आहे. तिच्या हातात कलिरे आहेत. हा फोटो पाहताच आयुष्यमानने यामीची चेष्टा करीत ‘पूरी जय माता दी वाली फिलींग आ रही है. आप दोनो ज्वालाजी गये थे? ‘, अशी कमेंट केली आहे. तर अभिनेता विक्रांत मेस्सीने तर कहरच केला आहे. त्याने यामीच्या फोटोवर कमेंट करताना ती राधे माँ सारखी दिसतेय असं म्हटले आहे. त्याने लिहिले, ‘राधे मॉं सारखी पवित्र आणि शुद्ध दिसत आहेस.’ यामिनी केलेली चेष्टा कंगनाला खपली नाही आणि तिने यावर कमेंट करीत यांची तुलना थेट झुरळासोबत करीत चप्पल आणा असे म्हटले आहे.

https://twitter.com/MuVyz/status/1401453517286436865

 

अभिनेता आयुषमान खुराणा आणि विक्रांत मेस्सी यांनी यामीच्या फोटोची अश्या पद्धतीने खिल्ली उडवलेली कंगनाला काही आवडलीही नाही आणि रुचली देखील नाही. तिने लगेच या दोघांना सणसणीत उत्तर दिले.’ हिमाचलमधील वधू सर्वात सुंदर दिसतात. देवीसारखचं त्यांच तेज दिव्य असतं,’ असे तिने आयुषमानला सुनावले.

तर अभिनेता विक्रांत मेस्सीच्या कमेंटवर उत्तर देताना मात्र कंगनाने त्याला चक्क झुरळची उपमा दिली आहे. ‘कुठून निघाला हा झुरळ, माझी चप्पल आणा,’ अशा शब्दांत तिने आपला संताप व्यक्त केला. आता यानंतर कदाचितच कुणीतरी हिमाचल बधुंची चेष्टा करण्याची हिम्मत करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here