PM Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Naredra Modi यांच्याबाबत जाणून घेण्याची अनेकांना इच्छा असते. अनेकजण मोदी यांचे दररोजचे वेळापत्रक कसे असते, मोदी कुठे कुठे जातात, त्यांच्याकडे कोणती कार आहे, हे कुठे राहतात, काय खातात हे लोक जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. यातीलच एक महत्वाचे म्हणजे मोदी कोणता फोन वापरतात हे आहे. अनेकांना हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की देशाचे पंतप्रधान कोणता फोन वापरत असतील. आज आम्ही याबद्दलच तुम्हाला माहिती देणार आहे.
देशाचे पंतप्रधान हे संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेत (COP 28) सहभागी होण्यासाठी दुबईला गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी जगभरातील काही प्रमुख राष्ट्रप्रमुखांची भेट घेतली. यावेळी त्यांनी इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचीही भेट घेतली आहे. मेलोनी यांनी पीएम मोदींसोबत काढलेला सेल्फीही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
यादरम्यान, सोशल मीडीयावर मोदी यांच्या हातामध्ये असलेला फोन दिसला असून हा फोन iPhone 15 Pro Max असल्याचे समजत आहे. तसेच या फोनचा रंग हा पांढरा आहे. तर या फोनची किंमत 1,59000 रुपये आहे. मात्र काही जण हा फोन iPhone 14 Pro Max असल्याचेही सांगत आहेत.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुबई दौऱ्यात विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांची भेट घेतली. यादरम्यान त्यांनी इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचीही भेट घेतली. मेलोनी यांनी पीएम मोदींसोबत सेल्फीही घेतला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि आम्ही चांगले मित्र आहोत, असे सांगितले आहे. फोटो शेअर करताना त्यांनी ‘#मेलोडी’ हा हॅशटॅग देखील वापरला आहे.
या दौऱ्यात मोदींनी या नेत्यांचीही भेट घेतली
मेलोनी व्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, ब्राझीलचे पंतप्रधान लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा, ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड कॅमेरून, माजी ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचीही भेट घेतली. पीएम मोदींनी संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेच्या चार सत्रांना संबोधित केले. तसेच परिषदेत पीएम मोदी आणि इतर नेत्यांनी एकत्र ग्रुप फोटोही काढला आहे.