पुणे प्रतिनिधी
सध्या पुण्यात स्मार्ट पुणे बनविण्याच्या धर्तीवर मेट्रोचं काम सुरु आहे. त्यासाठी स्वारगेट ला मल्टिमोड हब बनविण्यात येत आहे. स्वारगेट ते ऍग्रीकल्चर महाविद्यालय दरम्यान मेट्रो चं काम सुरु असताना जमिनीत १५ ते २० फुटावर भुयारी मार्ग सापडला आहे. हा भुयारी मार्ग तब्बल ५० ते ६० मीटर लांबीचे असून त्याची माहिती अद्याप कोणापर्यंतही नव्हती.
पायलिंग मशीन द्वारे खोदाईदरम्यान हा मार्ग सापडला आहे. या भुयारी मार्गामुळे शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी पुणे विद्यापिठात अशा प्रकारचा भुयारी मार्ग सापडला होता.
हा भुयारी मार्ग हा स्वारगेट बस स्टॉप मागील भागात सापडला आहे. नागरिक या ठिकाणाला पाहायला गर्दी करत असून या भागातील काम थांबवण्यात आलं आहे.
पुण्यात अशा भुयारी मार्गांचा अनेक वेळा शोध लागला आहे. परंतु हा मार्ग स्वारगेट ते शनिवार वाडा असण्याची दाट शक्यता आहे.असे भुयारी मार्ग शिवाजी महाराजांच्या आणि पेशव्याच्या काळात गुप्त मार्ग म्हणून बनवले गेले होत.