Whatsapp वर तुम्हांला कोणी ब्लॉक केलंय?? ‘अशा’ पद्धतीने करा चेक

Whatsapp Features
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सोशल मीडियावर व्हाट्सएप हे सर्वांचे आवडते आणि दमदार अप्प म्हणून ओळखले जाते. व्हाट्सअप द्वारे आपण आपल्या मित्रांसोबत चॅटिंग करू शकता, वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून एकत्रपणे संवाद साधू शकता, तसेच फोटो आणि व्हिडिओ एकमेकांना शेअर करू शकता. परंतु काही वेळा आपले मित्र किंवा मैत्रीण यांनी आपल्याला ब्लॉक केल्याचंही आपण ऐकलं असेल. व्हाट्सअँप वर आपल्याला कोणी ब्लॉक केलं आहे याची खातरजमा करण्यासाठी आम्ही सांगत असलेल्या या स्टेप फॉलो करा…

१) प्रोफाइल फोटो-

जर कोणी तुम्हाला ब्लॉक केलं आहे का? हे चेक करायचं असेल तर सर्वप्रथम त्या व्यक्तीच्या व्हाट्सअँप अकाउंट वरील प्रोफाइल फोटो दिसतोय का ते पहा. जर तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोणत्या व्यक्तीची प्रोफाइल फोटो पाहू शकत नसाल तर याची जास्त शक्यता आहे की, तुम्हाला त्या व्यक्तीने ब्लॉक केले आहे. परंतु, अनेक जण आपला प्रोफाइल फोटो ठेवत नाहीत हे सुद्धा तितकंच खरं आहे.

२) मेसेज डिलिव्हरी होतोय का पहा-

जर प्रोफाइल फोटो दिसत नसेल आणि तुम्हाला वाटत असेल कि या व्यक्तीने आपल्याला ब्लॉक केलं आहे तर सरळ त्या व्यक्तीला मेसेज पाठवा. जर मेसेज डिलिव्हर होत नसेल तर समजायचं कि एकतर त्या व्यक्तीचे इंटरनेट बंद असेल किंवा त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले आहे. जर मेसेज २-३ दिवसांनंतरही त्या व्यक्तीपर्यंत जात नसेल तर शक्यता आहे की, त्याने तुम्हाला ब्लॉक केले आहे.

३) व्हाट्सअँप कॉल करा-

जर तुमचा मेसेज त्या व्यक्तीपर्यंत जात नसेल आणि तुम्हाला शंका वाटत की त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलं आहे तर सरळ त्या व्यक्तीला कॉल करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर ब्लॉक केले असेल तर कॉल कनेक्ट होणार नाही.

४) ऑनलाइन स्टेट्स दिसतोय का पहा-

जर तुमच्या कॉन्टॅक्ट मधील व्यक्तीने त्याचा स्टेटस ठेवला असेल तर त्या व्यक्तीचे स्टेट्स तुम्हाला दिसेल. परंतु, जर त्या व्यक्तीचे ऑनलाइन स्टेट्स दिसत नसेल तर त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले आहे, असे समजावे.

५) ग्रुप मध्ये ऍड करण्याचा प्रयत्न करून पहा –

जर तुम्हाला कोणीतरी व्हॉट्सॲपवर ब्लॉक केले आहे अशी शंका असेल तर एक ग्रुप बनवा त्या ग्रुपमध्ये त्या व्यक्तीला अॅड करण्याचा प्रयत्न करा. त्याने जर तुम्हाला ब्लॉक केले असेल तर तुम्हाला you are not authorized to add this contact हा मेसेज दिसेल.